Ex Cricketer Aakash Chopra Asked Question On Chhaava: छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि त्यांची किर्ती रुपेरी पडद्यावर दाखवणाऱ्या 'छावा' चित्रपटाची (Chhaava Movie) चर्चा फक्त देशभरातच नाहीतर संपूर्ण जगभरात सुरू आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल (Vicky Kaushal) दिसून आला आहे. तर, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) साकारली आहे. फक्त प्रेक्षकच नाहीतर, सिनेमा क्रिटिक्सही या सिनेमाची चर्चा करत आहेत. चित्रपटाची भव्यता, शंभू राजांचा पराक्रम आणि त्यांचा त्यानंतर त्यांचा त्याग, सारं पाहून प्रत्येकजण हळहळला आहे. चोहीकडे चित्रपटाचीच हवा असताना टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूनं मात्र, एक प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 


'छावा'मुळे मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आका श चोप्रानंही 'छावा' पाहिला. पण, चित्रपट पाहिल्यानंतर त्याला राहावलं नाही आणि त्यानं प्रश्न उपस्थित केला. सध्या त्याच्या या प्रश्नाची जोरदार चर्चा होत आहे. आकाश चोप्रानं आमच्या शाळेच्या इतिहासातील पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेखही नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, ज्यावेळी अकबर आणि औरंगजेबांसारख्या मुघल शासकांबाबत शिकवलं गेल्याबाबतही त्यानं आश्चर्य व्यक्त केलंय. 






'छावा' पाहिल्यानंतर आकाश चोप्रानं एक ट्वीट केलंय. त्यात त्यानं म्हटलंय की, "आज 'छावा' पाहिला... शौर्य, निस्वार्थता आणि कर्तव्यभावनेची अविश्वसनीय कहाणी... शाळेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबाबत काही शिकवलं गेलं नाही? कुठेही उल्लेख नाही, हा खरा प्रश्न आहे. अकबर एक महान, न्याय ,सम्राट कसा? हे आम्हाला शिकवलं गेलं आणि दिल्लीत औरंगजेब रोड नावाचा एक रस्तादेखील आहे... हे का, कसं घडलं?" 


अक्षय चोप्राच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काहींनी त्यानं मांडलेल्या विचारांचं समर्थन केलं. तर, काहींनी धार्मिक आणि राजकीय गोष्टींमध्ये अडकल्याबद्दल त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


"चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय"