एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Entertainment News Live Updates 19 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 19 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Sargam Koushal : सरगम ​​कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब

Sargam Koushal Mrs. World 2022 : भारताच्या नावावर आणखी एक सुवर्ण किताब नोंदविण्यात आला आहे. भारतासाठी हा एक सुवर्ण टप्पा आहे. भारताच्या सरगम ​​कौशलने (Sargam Koushal) अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022-23 (Mrs. World 2022-23 Pageant) चे विजेतेपद पटकावले आहे. सरगमचा मुकुट परिधान केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल सर्व भारतीय आणि सेलिब्रिटींकडून सरगमचे अभिनंदन करत आहेत. 

Sath Sobat : 'साथ सोबत' चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

Sath Sobat : 'साथ सोबत' (Sath Sobat) या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या 'साथ सोबत'च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 'साथ सोबत' या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Avatar 2 Box Office Collection: 'अवतार 2' नं केली छप्पर फाड कमाई

Avatar 2 Box Office Collection: दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या  'अवतार' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'अवतार 2' 
(Avatar 2) म्हणजेच 'अवतार द वे ऑफ वाटर' (Avatar The Way Of Water)  हा चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला  चांगली कमाई केली असून दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 'अवतार 2' ने भारतात 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटानं जवळपास 42-43 कोटींची कमाई केली आहे.  दोन दिवसांत या चित्रपटानं जवळपास 83-84 कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने जगभरात दोन दिवसांमध्ये  1500 कोटींची कमाई केली आहे. 

17:56 PM (IST)  •  19 Dec 2022

Vaalvi Teaser: 'दिसतं तसं नसतं'; 13 जानेवारीला प्रदर्शित होणार 'वाळवी' , टीझर पाहिलात?

Vaalvi Movie: झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. 'दिसतं तसं नसतं' अशी टॅगलाईन असलेल्या 'वाळवी' (Vaalvi) या चित्रपटाचे एक भन्नाट टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून नवीन वर्षात म्हणजेच येत्या 13 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

पाहा टीझर: 

 

15:08 PM (IST)  •  19 Dec 2022

Shubhvivah : यशोमन आपटेचं छोट्या पडद्यावर कमबॅक

Yashoman Apte On Shubhvivah : अभिनेता यशोमन आपटे (Yashoman Apte) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. याआधी रोमॅंटिक हिरोच्या भूमिकेत यशोमन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता 'शुभविवाह' (Shubhvivah) या मालिकेत तो मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशच्या भूमिकेत दिसणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yashoman Apte (@apt_yashomaan)

14:47 PM (IST)  •  19 Dec 2022

Bigg Boss Telugu 6 Winner: घर, गाडी आणि लाखोंचे बक्षीस; बिग बॉस तेलगू- 6 चा विजेता ठरलेल्या रेवंतवर बक्षिसांचा पाऊस

Bigg Boss Telugu 6 Winnerछोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉसला प्रेक्षकांची पसंती मिळते. काल (19 डिसेंबर) बिग बॉस तेलगू (Bigg Boss Telugu 6) सीझन-6 चा ग्रँड फिनाले पार पडला. हा शो 4 सप्टेंबर 2022 रोजी सुरु झाला होता. बिग बॉस सीझन-6 च्या या सीझनता रेवंत (LV Revanth) हा विजेता ठरला. तर फर्स्ट रनर-अप श्रीहन (Shrihan) हा ठरला. हे दोघेही बिग बॉस तेलगूच्या या सीझनचे प्रसिद्ध स्पर्धक आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shrihan (@imshrihan)

13:45 PM (IST)  •  19 Dec 2022

Amit Antil : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Amit Antil : मॉडेल व छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अमित अंतिल (Amit Antil) विरोधात लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

12:53 PM (IST)  •  19 Dec 2022

'Salaar' ते 'Pushpa 2'; पुढील वर्षात रिलीज होणार 'हे' धमाकेदार पॅन इंडिया सिनेमे

South Films In 2023 : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूपच आनंददायी होतं. केजीएफ चॅप्टर 2 (KGF 2), कांतारा (Kantara) आणि आरआरआर (RRR) सारख्या अनेक पॅन इंडिया सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. एकंदरीतच या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाली. आता दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पुढील वर्षातदेखील कायम राहणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget