Mirzapur Teaser Out: ॲमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेली वेब सिरीज मिर्झापूर (Mirzapur The film) आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. ओटीटीवर हिट झालेल्या या वेब सिरीजचे तीन सीजन आले असून तीनही सीजन लोकप्रिय ठरले. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्यांदू शर्मा अशी तगडी स्टारकास्ट असलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली. मिर्झापूरचा पुढचा सीजन कधी येणार याची उत्सुकता ताणलेली असतानाच आता या वेब सिरीजला निर्माते मोठ्या पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहेत, असं दिसतंय. 'भौकाल भी बडा होगा और पडदा भी' असं म्हणत 'मिर्जापुर द फिल्म' या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आहे.
आता मिर्जापूर द फिल्म याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्याची पहिली झलक ही दाखवण्यात आली आहे. एक्सेल मुव्हीजने या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलाय. यात कालीन भैया, गुड्डू पंडित आणि मुन्नाभय्या यांचा जबरदस्त स्वॅग या टीजरमध्ये पाहायला मिळतोय.
गद्दी से नही उठे तो रिस्क...
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या टिझरमुळे प्रेक्षकांची उत्सूकता ताणली गेली आहे.मिर्झापूरच्या गादीचा खेळ आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. आता मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर राजकारणाचा रक्तरंजित थरार अनुभवायला मिळणार असल्याचं या टिझरवरून दिसतंय. यात पंकज त्रिपाठी सुरुवातीला खुर्चीत बसून म्हणतो, या टीजरमध्ये आत्तापर्यंत सर्वांनी मिर्जापूर आपापल्या गाद्यांवर बसून पाहिली. पण आता गादीवरून उठला नाही तर रिस्क आहे. असं पंकज त्रिपाठी म्हणताना दिसत आहे. मग गुड्डू पंडित आणि मुन्नाभय्या यांची एन्ट्री होते. हातात चाकू घेऊन त्यांचा वेगळाच स्वॅग दिसत आहे. आता मिर्जापूर तुमच्यापर्यंत येणार नाही.. तुम्हाला मिर्जापूरपर्यंत यावं लागेल.. अब भौकाल भी बडा होगा ऑर पडदा भी... असं म्हणत मिर्झापूर द फिल्म या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
कधी प्रदर्शित होणार मिर्जापूर द फिल्म?
मिर्जापूर या वेब सिरीजचा आता चित्रपट होणार आहे. गुरमीत सिंग यांचे दिग्दर्शन असणारा या चित्रपटाची निर्मिती रितेश सिद्धवाणी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. मिर्जापूर द फिल्म हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2026 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल असे या टीजरवर दिलेल्या माहितीतून दिसते. या टीजरवर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.