Bigg Boss 18: सध्या हिंदी टेलिव्हिजन दुनियेत बिग बॉस 18 हा शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं दिसतंय. गेल्या दोन दिवसांपासून वीकेंड का बार मध्ये कोणत्या स्पर्धकाला बिग बॉसच्या षयी उत बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याविषयी उत्सुकता होती. अखेर शनिवारच्या एपिसोडमध्ये मुस्कानचा घरातील प्रवास संपल्याचं बिग बॉसने जाहीर केलं. त्यानंतर घरातून बाहेर पडल्यावर बिग बॉस मधील तिचा प्रवास कसा होता याविषयी तिने सांगितलं. सध्या घरातील स्ट्रॉंग स्पर्धक कोण? घरातील तिचे बेस्ट फ्रेंड कोण होते? घरात सर्वात जास्त डर्टी कोण खेळतंय? अशा सगळ्या प्रश्नांवर तिनं तिचा अनुभव सांगितला. 


मनात जे आहे ते तिथेच बोलायला हवं 


बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मुस्कान बामणे हिने घरातील अनुभवाविषयी सांगितलं. आपल्या मनात जे आहे ते तिथल्या तिथे बोलायला हवं हे मी बिग बॉसच्या घरात शिकले असं मुस्कान म्हणाली. कोणतीही गोष्ट मनात न ठेवता तिथल्या तिथे बोलून टाकायची हे मी शिकले. घरातील अनुभव मजेशीर आणि अनुभव देणारा होता. 


घरात सर्वात डर्टी कोण खेळतंय? 


मुस्कान ने या प्रश्नावर हसत उत्तर दिलं की सगळेच डर्टी खेळतात. पण नंतर तिचे उत्तर सावरत तिने प्रत्येक जण आपापल्या परिणाम चांगला खेळत आहेत. मला सध्या तरी हे सांगता येणार नाही असं मुस्कान म्हणाली. जर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाता आलं तर नक्की जाईन आणि खूप बोलेन असं मुस्कान हसत म्हणाली. 


 






कोणते तीन स्पर्धक शेवटपर्यंत टिकतील? 


मुस्कानच्या मते घरात टॉप थ्री मध्ये विवियन, शिल्पा आणि करणवीर हे तिघे जातील. असं मुस्कान म्हणाली. दरम्यान घरातील तिच्या एक्सिटने नेटकरीही तिला पाठिंबा देताना दिसतायत. अनेकांना तिचा बिगबॉसमधील प्रवास थांबवणे पटलेले दिसत नाही. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोखालील कमेंटमध्ये अनेकांच्या अशा स्वरुपाच्या प्रतिक्रीया आल्या आहेत.


घरातील बेस्ट फ्रेंड कोण? 


बिग बॉसच्या घरात सर्वात पहिल्यांदा मी ज्यांच्याशी बोलले शहजादा, अविनाश आणि विवियन हे बिग बॉसच्या घरातील माझे सगळ्यात चांगले मित्र होते. असं मुस्कान बामणे हिने सांगितलं.


सारा, मुस्कान की ताजिंदर?


बिग बॉसच्या घरात तिसरा आठवडा सुरु असून आता घरातील एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागणार आहे. हा घरातून एलिमिनेट होऊन बाहेर पडणारा दुसरा स्पर्धक असेल. बिग बॉसच्या प्रोमोनुसार, सारा, मुस्कान आणि ताजिंदर या तिघांपैकी एक जण बिगबॉसच्या घराला निरोप देणार आहे. कलर्स टीव्हीने प्रोमो शेअर करत त्यावर एलिमिनेशनच्या प्रक्रियेतून होणार आहे बिग बॉसच्या एका सदस्याचा The End असं लिहिलं आहे.


हेही वाचा:


CID Promo: जुनी दोस्ती विसरून अभिजितनं झाडली दयावर गोळी, CID मालिकेचा नवा प्रोमो समोर