Big Boss Marathi:  बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सांगता दणक्यात झाली असून गेल्या 70 दिवसांपासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ संपला आहे. सगळ्यांना बुक्कीत टेंगूळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला. गायक असलेला अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला विजेता सुरज चव्हाणवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतोय. शिवाय सगळ्याच स्पर्धकांचं आपापल्या कुटुंबाकडून, गावातील चाहत्यांकडून दणक्यात स्वागत होताना दिसतंय. बिगबॉसच्या घरात ७० दिवस राहून परत आल्यावर टॉप ६ सदस्यांचं घरी जंगी स्वागत होतंय. जान्हवी किल्लेकर हिच्या घरच्यांनी केलेल्या तिच्या स्वागताचा व्हिडिओ आता चांगलाच गाजतोय. घरी परतल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलं. यावेळी जान्हवीनंही ठेका धरला होता. यावेळी तिनं तिच्या मित्र मैत्रीणींची भेट घेतली. तिच्या या व्हिडिओवर तिच्या बिगबॉसच्या घरातील निर्णयाचे नेटकऱ्यांनी कौतूक केले. 


जान्हवीनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. बिग बॉसच्या शेवटच्या ट्विस्टमध्ये ९ लाखांची निवड करत घरातून बाहेर पडण्याचा तिचा निर्णय अगदी योग्य असल्याचं नेटकरी म्हणतायत.


ढोलताशा वाजवत जंगी स्वागत


जान्हवी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच वाजतोय, ढोल ताशांच्या गजरात तिच्या कुटुंबियांनी तिचं स्वागत केलंय. यावेळी तिच्या घराबाहेरच्या अंगणात तिचे सर्व आप्तेष्ट जमले  होते. तिच्या टॉप ६च्या यशाचं कौतूक सगळ्यांनी केलं. ढोल ताशाच्या गजरात तिच्या नवऱ्यासह तिचा मुलगा आणि सर्व मित्रमैत्रिणींनी ठेका धरला होता. त्यांच्या भेटीनंतर जान्हवीनंही त्या सगळ्यांसोबत नाच करत आनंद साजरा केला. 


 






नेटकऱ्यांनी केलं जान्हवीच्या निर्णयाचं कौतूक


खरंच जानव्ही तु खरी खेळाडू निघाली.टॉप 2 ते 5 पर्यंत फक्त 1 1 लाख घेतले ? पण तु 10 लाख घेऊन आलीस मानलं तुला..ग्रेट निर्णय घेतला आणि लोकांचा निर्णय तुला आधीच समाजाला होता .. 70 दिवसात 9 लाख कमवले व्हा जानवी अभिनंदन...दहा लाखाचे बिनजोडचे मानकरी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.. असं म्हणत नेटकऱ्यांनी जान्हवीच्या निर्णयावर स्तूतीसुमनं उधळली. 




जान्हवी किल्लेकरला 9 लाख रुपयांचे बक्षीस


या स्पर्धेतील टास्क क्वीन अशी ओळख असलेल्या जान्हवी किल्लेकरने मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमावले. पहिल्या सहा स्पर्धकांमध्ये असलेल्या जान्हवीने अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तिला तब्बल 9 लाख रुपये मिळाले. जान्हवी ही सहाव्या क्रमांकावर राहिली होती, त्यामुळे तिने पैसे घेण्याचा निर्णय तिच्यासाठी योग्य ठरला.