Entertainment: संजय लीला भन्साळी यांचा इंशाअल्लाह हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमात तब्बल १९ वर्षांनंतर सलमान खान आणि संजय लीला भन्साळी एकत्र येणार असल्यानं या चित्रपटाची मोठी चर्चा होती. आलिया भट्टला या सिनेमासाठी साइन करण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव आता ही फिल्म बासनात गुडांळली गेली आहे. संजय लीला भन्साळी सलमान खान आणि क्रिएटर्समध्ये झालेल्या काही अंतर्गत वादांमधून चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. पण सध्या या चित्रपटासंदर्भात आलिया भट्टनं केलेंलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलिया भट्ट हिनं इंशाअल्लाहच्या बाबतीत सलमानशिवायच ही फिल्म सुरु झाली तर चांगली अशी हिंट दिली आहे.

इंशाअल्लाह ही एका ४० वर्षीय बिझनेसमन आणि २० वर्षीय महत्वकांक्षी ॲक्ट्रेसमधील रोमँटिक गोष्ट आहे. पण ऐनवेळी हा चित्रपट बंद करण्यात आल्यानं या चित्रपटाची बोलणी फिस्कटल्याचं दिसून आलं. या फिल्मनंतर भन्साळींनी आलियाला गंगुबाई काठीयावाडीची ऑफर दिली होती.

Continues below advertisement


काय म्हणाली आलिया भट्ट?


द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आलियानं सांगितलं, जेंव्हा तिला इंशाअल्लाह या चित्रपटाविषयी विचारलं गेलं तेंव्हा ती म्हणाली, मी संजय सरांसोबत आणखी एक सिनेमा करत आहे. ज्याचं नाव लव्ह अँड वॉर असं आहे. मला आशा आहे की ते ही फिल्म लवकरच बनवतील. याची कथा फार गोड आहे.


सलमानला रिप्लेस करणार भन्साळी?


आलियानं या मुलाखतीत मस्करीतच असं सांगितलं की संजय सरांना कदाचित सलमान खानलाच रिप्लेस करावं लागेल. कारण त्यांच्यामध्ये क्रिएटीव्ह मतभेद झाले होते. संजय सर जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. तो सिनेमासाठी बेस्ट ठरेल. असे आलिया म्हणाली. म्हणजे सलमान खान या सिनेमात नसेल तरी हरकत नसल्याची हिंट आलियानं दिल्यानं सध्या तिच्या या वक्तव्याची चर्चा आहे.


लव्ह अँड वॉरसाठी कलाकार तयार


आलिया भट्ट आणि भन्साळी पुन्हा एकदा लव्ह अँड वॉरवर एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत, एक भव्य प्रकल्प ज्यामध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल देखील असतील. भन्साळी यांनी प्रकाशनाशी केलेल्या संभाषणात नमूद केले की हा चित्रपट विशेषतः महत्वाचा आणि आव्हानात्मक आहे आणि त्यामध्ये सर्वकाही ओतण्याचा त्यांचा निर्धार आहे. हा प्रेम त्रिकोण मार्च 2026 मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.