Big Boss 18: बिग बॉस 18 च पर्व सध्या या न त्या कारणाने कायमच चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे बिग बॉसच्या टास्कमधली स्पर्धकांची खेळी तर दुसरीकडे घरात येणारे पाहुणे. बिग बॉसच्या घरात रविवारच्या एपिसोडमध्ये कलाकारांची मांदियाळी होती. बिग बॉसच्या घरात पुन्हा नवीन टास्क आल्याने आता पुन्हा एकदा स्पर्धक आमने-सामने येताना दिसतात. नुकताच कलर्स tv ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. 


कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमो खाली या कमबॅक मध्ये तुमच्या नजरेत विनर कोण? असा सवाल करत हा व्हिडिओ अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 


तुला कोण ओळखतं? करणविर थेटच म्हणाला


बिग बॉसच्या नवव्या एपिसोडमध्ये करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यात चांगलंच वाक् युद्ध झाल्याचे दिसलं. तुला कोण ओळखतं असं म्हणत करणवीरनं अविनाशला टार्गेट केल्याचे दिसलं. यावर कमबॅक करत अविनाश मिश्रा यांन जो शो सोडून आला त्याला कोण ओळखतं असं म्हणत करणवीरला छेडलं. माझ्या नावासोबत जीत जोडला गेला आहे असं करणवीर म्हणाला. तुझ्या नावाला एका शो मधून काढून टाकल्याचं टॅग लागल्याचं करणवीर म्हणाला. कमबॅकच्या या लढतीत घरात वातावरण चांगलेच तापले होते. 


पापा से पंगा लिया म्हणत अविनाशला झापलं 


तुझ्या नावापुढे एका शो मधून काढून टाकल्याचा टॅग लागल्याचे म्हणत करणवीरनं तू वडिलांशीही पंगा घेतलायस. तुझा नं  37  आहे. तुझ्या आधी 36 लोकांना सरळ केलंय. असे म्हणत करणवीरने सगळ्यांचाच लक्ष वेधून घेतल्याचे दिसत आहे. कालच्या एपिसोडची सुरुवात अविनाश, ईशा आणि ॲलिस कौशिक या मित्रांनी केली होती जे वादात सापडले होते. जेव्हा ॲलिसने इशाला तिच्या वागणुकीसाठी हाक मारली तेव्हा त्यांचा त्रास वाढला.. घरातील तिच्या भूमिकेबद्दल गंभीर असलेल्या शिल्पा शिरोडकरचा अनादर केल्याबद्दल त्यांनी त्याला त्वरित बोलावले.


बिगबॉसचा टाईम गॉड टास्क


बिगबॉसनं एक नवा टास्क जाहीर केला आहे. या टास्कचं नाव टाईम गॉड असं आहे. कालच्या एपिसोडला एक मनोरंजक वळण मिळाले जेव्हा आफरीन खानला 'टाइम गॉड' म्हणून घोषित करण्यात आले. आफरीन खान 'टाइम गॉड' चा किताब मिळाला. त्याच्या खेळाने आम्ही थक्क झालो आहोत. अनेक मारामारी आणि वाद झाल्यानंतरही, त्याने आपले नाव सुरक्षित असल्याची खात्री केली आणि बिग बॉसच्या घरातील प्रथमच गॉडचा किताब जिंकला.