Emmanuel Macron Interacts with celebrities in Mumbai: फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.  या मुंबई दौरादरम्यान त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. तसेच बॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली. त्यांच्याशी कला आणि संस्कृती या विषयावर चर्चा केली.  बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरसह,  शबाना आझमी, यांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांची भेट घेतली.  प्रसिद्ध अभिनेते तसेच संगीतकारांनीही त्यांची भेट घेऊन कला आणि संस्कृतीविषयी चर्चा केली. 

फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी काही बॉलिवूड स्टार्ससोबत खास भेट  घेतली. यामध्ये शबाना आझमी, अनिल कपूर, मनोज बाजपेयी, दिग्दर्शक झोया अख्तर, रिचा चड्डा आणि ग्रॅमी विजेते संगीतकार  रिकी केज यांचा समावेश होता. यावेळी राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे बॉलिवूड कलाकारांशी संवाद साधताना दिसले.  ते विशेषत: अनिल कपूरशी संवाद साधताना दिसले.  

 

या खास आणि अविस्मरणीय भेटीनंतर राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत कलाकारांनी फोटो काढले.  या भेटीत  कलाकार आणि राष्ट्रध्यक्षांमध्ये बरीच चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या भेटीमुळे भारत आणि फ्रान्स यांच्यात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सहकार्य वाढण्याची शक्यता निर्माण झालीये.

राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्वत:  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या भेटीदरम्यानचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.  या सर्व फोटोंमध्ये राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन कलाकारांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह, संस्कृती आपल्याला एकत्र आणते..' इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारतात सोमवारी रात्री उशिरा पोहोचले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे  स्वागत  केले. 

मंगळवारी त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींना भेट दिली. तसेच सर्व स्टार्ससोबत एक ग्रुप फोटोही काढण्यात आला.  या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचं दु:खद निधन; घरातच घेतला अखेरचा श्वास

सलमान खानचे वडील रुग्णालयात, सलीम यांची प्रकृती बिघडली; बापाची काळजी घेणारा लेक हॉस्पिटलमध्ये..