Ek Deewane Ki Deewaniyat Worldwide Box Office: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) एक सिनेमा धुमाकूळ घालतोय. एवढा की, या सिनेमानं 145 कोटींच्या आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) 'थामा'लाही धूळ चारली आहे. फक्त 25 कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा गल्ला केला. आम्ही ज्या सिनेमाबाबत सांगतोय, तो सिनेमा म्हणजे,  हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि सोनम बाजवा (Sonam Bajwa) यांचा रोमँटिक ड्रामा असलेला 'एक दीवाने की दिवानियात'.

Continues below advertisement

हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा 'एक दीवाने की दिवानियात' सध्या चांगलाच गाजतोय. मिलाप झवेरी यांचा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली आहे की त्याने फक्त 12 दिवसांत जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे तो वर्षातील सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे.

'एक दीवाने की दिवानियात' बॉक्स ऑफिसवर गाजतोय 

ट्रेड एक्सपर्ट्सच्या मते, 'एक दीवाने की दिवानियात'नं 14 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 66 कोटी (80 कोटींची एकूण कमाई) कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 86 कोटींची कमाई नोंदवली आहे. सोमवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, चित्रपटाच्या निर्मिती संस्थेपैकी एक असलेल्या 'देसी मूव्हीज फॅक्टरी'नं जाहीर केलं की, 'एक दीवाने की दिवानियात' सिनेमानं दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस भारतात 86.1 कोटी आणि परदेशात 15 कोटींची कमाई केली आहे. ज्यामुळे जगभरात त्याची एकूण कमाई 101 कोटींवर पोहोचली आहे. बिझनेस सोर्सेसनुसार, हा आकडा अजूनही 92 कोटींच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे आणि काही दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडू शकते. दरम्यान, 'थामा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 120 कोटी आहे.

Continues below advertisement

'एक दीवाने की दिवानियात'चा दुसरा रोमँटिक ड्रामा 

2025 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक ड्रामासाठी चांगलं राहिलंय. 'सैय्यारा' हा चित्रपट 575 कोटींपेक्षा जास्त कमाईसह क्लियर विनर आहे. तर दुसरी फिल्मही धमाकेदार परफॉर्म करतेय. अशातच आता दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी मिलाप झवेरीच्या सिनेमानं सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या 'परम सुंदरी' (86 कोटी) आणि राजकुमार रावच्या 'भूल चुक माफ'नं (91 कोटी) लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horror Thriller Film: रिलीजच्या तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, बॉक्स ऑफिस गाजवतेय साऊथची 'ही' हॉरर थ्रिलर फिल्म; बाहुबली, थामा सगळे हिच्यासमोर फेल