Bigg Boss Marathi : रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 28 जुलै रोजी कलर्स मराठी वाहिनीवर हा सिझन सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या या सिझनची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. पण या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे कोणते लाडके कलाकार या सिझनमध्ये सहभागी होणार हे येत्या 28 जुलैला समजेल.
दरम्यान याआधी अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा सुरु आहे. यामध्ये अंकिता वालावलकर, चेतन वडनेरे, विवेक सांगळे या कलाकारांच्या नावांच्या चर्चा आहेत. त्यातच आता दुनियादारी सिनेमातला एक कलाकार बिग बॉसच्या घरात सामील होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वाहिनीकडून शेअर करण्यात आलेल्या एका सोशल मिडिया पोस्टमुळे या चर्चा रंगू लागल्यात.
ती पोस्ट नेमकी काय?
कलर्स मराठी वाहिनीवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं की, दोस्तीच्या दुनियेतील यार, एक नंबर कलाकार कोण आहे हा? असा सवाल विचारला आहे. त्यामुळे दुनियादारी सिनेमातला कलाकार बिग बॉसच्या घरात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. याआधी दुनियादारी सिनेमातला अभिनेता सुशांत शेलार हा बिग बॉसच्या पहिल्या पर्वात घरात दिसला होता. त्यामुळे आता या सिझनमध्ये घरात कोण दिसणार याची चर्चा सुरु झाली आहे.
'हे' कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?
वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असंत! या मालिकेत दिसत होत्या. पण त्यांनी आता या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं बिग बॉसच्या घरात स्वागत केलं आहे. त्यामुळे वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दिसणार का याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अंकिताची एन्ट्री होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरच्या तिच्या काही पोस्टमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. म्हणूनच बिग बॉसच्या घरात येणारी पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का? अशा चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत.
दरम्यान चेतन आणि विवेक या दोघांच्याही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. त्यातच त्या दोघांचे सध्या कोणते प्रोजेक्ट सुरु आहे, याबाबतही काही माहिती नाही. त्यामुळे हे दोघेही आता बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.