Drishyam 3 the Conclusion Climax: 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. डोकं चक्रावून टाकणाऱ्या या सिनेमात 'सॅम'च्या (Entertainment) मृत्यूचं सत्य उलगडणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. 'दृश्यम 3' या सिनेमात कन्क्ल्यूजन काय असणार?  याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. एंडिंग डिसाईड करण्यासाठी  100 हून अधिक ड्राफ्ट तयार झाले, अशी माहिती समोर आली आहे.  'दृश्यम 3' या सिनेमाचे  स्क्रीनरायटर (ScreenWriter) आमिल कियान खान यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी या सिनेमाच्या निगडीत अनेक खुलासे शेअर केले. तसेच एंडिंगबाबतही काही किस्से शेअर केले.  'तिसऱ्या भागासाठी नवीन कथा लिहिणं हे सर्वात मोठे आव्हान होते. जी मुळ कथेला कॉपी न करता, फ्रँचायझीचा आत्मा कायम ठेवेल', असं स्क्रीनरायटर म्हणाले.

Continues below advertisement

'दृश्यम 3' या सिनेमाचं एंडिंग कसा तयार झाला? (Drishyam 3 the Conclusion Climax Ending took over 100 drafts)

'दृश्यम' या फ्रँचायझीमधील पहिले दोन भाग हे मल्याळम 'दृश्यम'चे रिमेक होते.  तर, तिसऱ्या भागात विजय साळगांवकर आणि त्यांच्या कुटुंबाची वेगळी कहाणी आणि एंडिंग दाखवण्यात येणार होते.  जेणेकरुन या सिनेमाच्या एंडिंगला एक नवीन दिशा मिळाली.  'द फ्री प्रेस जर्नल' सोबत चर्चा करताना आमिलने,  लेखन ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक होती, असं म्हटलं आहे.  आमिल म्हटला की,  'ही प्रोसेस एका मोठ्या पर्वतावर चढण्यासारखे होते. तुमच्याकडे एक लोकप्रिय फ्रँचायझी असते. एक लोकप्रिय असं कुटुंब ज्याच्याशी प्रेक्षक वर्षानुवर्षे जोडले गेले आहेत.  तसेच दोन अत्यंत आवडलेल्या  सिनेमांच्या वारशाचे ओझे तुमच्या खांद्यावर असते.  सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,  तिसऱ्या भागात, तुम्ही प्रेक्षकांना कसे आश्चर्यचकीत करणार?'.

'ओरिजिनल स्क्रीनप्ले लिहिणे एक आव्हान होते.   यात ह्यूमर, कुटुंब, इमोशन, ड्रामा आणि थ्रिल असणं गरजेचं होतं.  कोणताही एक घटक एक दुसऱ्यावर हावी होता कामा नये. हा एक खूप कठीण  समतोल साधण्याचा प्रयत्न होता', असं सिनेमाचे स्क्रीनरायटर म्हणाले.  त्यांनी सांगितलं की,  सिनेमाची एंडिंग, क्लायमॅक्सला न्याय देणं सोपं नव्हतं.  फायनल व्हर्जनपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच ड्राफ्ट तयार करण्यात आले, असा खुलासा त्यांनी केला. 'माझ्याकडे ड्राफ्ट आहे.   FINAL, FINAL 1, FINAL 2, FINAL PLEASE GOD अशा नावाने आहे. वेगवेगळे 100 हून अधिक ड्राफ्ट असतील', असंही आमिल कियान खान म्हणाले.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...