Drishyam 3 Movie OTT Release: अजय देवगण (Ajay Devgn) अभिनीत 'दृश्यम:द कन्क्लूजन' (Drishyam 3) या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला. या सिनेमाने ओपनिंग डेलाच धमाकेदार कमाई केली. प्रदर्शनाच्या काही दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड्स मोडले.  रविवारी दुपारपर्यंत या चित्रपटाने 294 कोटींचा व्यवसाय केला. तर वर्ल्डवाईड या चित्रपटाने 420 कोटींचा आकडा पार केला. ही नेट कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, सॅमची बॉडी सापडणार की नाही? या उत्सुकतेपोटी प्रेक्षक सिनेमागृह गाठत आहेत. दरम्यान, या चित्रपटाबाबत मोठी गुडन्यूज आहे. 'दृश्यम:द कन्क्लूजन' या सिनेमाच्या OTTच्या (OTT Platform) संबंधित एक मोठा बातमी समोर येत आहे.  हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सस्पेन्स, थ्रिलर 'दृश्यम 3' हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार? कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? पाहूयात.

Continues below advertisement

अजय देवगण अभिनीत आणि अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम 3' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  याची माहिती सिनेमाच्या ओपनिंग क्रेडिट्समध्ये देण्यात आली आहे. नियमानुसार, प्रत्येक चित्रपट प्रदर्शनाच्या 6 ते 8 आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतो.  क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार,  'दृश्यम 3' हा चित्रपट 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत रिलीज होऊ शकतो. दरम्यान, फिल्म मेकर्सने अद्याप या फिल्मच्या संबंधित आणि ओटीटी रिलीजच्या संबंधित कोणतीही अधिकृत माहिली दिलेली नाही. दरम्यान, 'दृश्यम 3' हा सस्पेन्स - थ्रिलर चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'दृश्यम 3' या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका

'दृश्यम 3' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  या चित्रपटाने ओपनिंग डेला 62 कोटी रुपयांची कमाई केली.  विकडेजमध्येही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. 'दृश्यम 3' या सिनेमाने दुसऱ्या विकेंडमध्ये पाऊल ठेवलं आहे.  दुसऱ्या शनिवारी या थ्रिलर सिनेमाने 26 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.  'दृश्यम 3' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 300 कोटी रूपयांपर्यंतचा आकडा गाठला आहे.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक