Drishyam 3 First Week Collection: मोहनलाल (Mohanlal) स्टारर सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर 'दृश्यम 3'ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. तसेच मल्याळम चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला. सोमवारीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड केली. दरम्यान, सहाव्या दिवशी प्रेक्षकांकडून 'दृश्यम 3' सिनेमाला किती प्रतिसाद मिळाला? पाहूयात.
'दृश्यम 3' सिनेमाने सहाव्या किती कोटींची कमाई केली? (Drishyam 3 first week collection report)
बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' सिनेमातून मोहनलाल जॉर्जकुट्टीच्या भूमिकेतून परतले आहेत. मीना, अंसीबा हसन आणि एस्थर अनिल यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमात डोकं चक्रावून टाकणारे थ्रिलर दाखवण्यात आलं आहे. यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पहिल्या आठवड्यात दमदार कामगिरी केल्यानंतर आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.
परदेशातही 'दृश्यम 3' सिनेमाचा डंका (Drishyam 3 overseas box office collection)
सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, 'दृश्यम 3' ने पहिल्या दिवशी 15.85 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 11.05 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तिसऱ्या दिवशी 13.70 कोटी रुपये कमावले. तर, चौथ्या दिवशी 13.85 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. तसेच पाचव्या दिवशी या सिनेमाने 7.70 कोटी रुपये कमावले.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3' ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी 6.45 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे 'दृश्यम 3' ची 6 दिवसांची एकूण कमाई आता 68.60 कोटी रुपये झाली आहे. वर्ल्डवाइड या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शनाच्या सहा दिवसांत ओवरसीस बॉक्स ऑफिस कलेक्शन 84.70 कोटी रुपये झाले आहे. ज्यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 164.32 कोटी झाली आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाने 'आदुजीविथम: द गोट लाइफ'च्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत
ABP माझाच्या बातम्या LIVE...
