Chandra Barot Death : बॉलीवूडमध्ये 'डॉन'सारखा सर्वात गाजलेला सिनेमा बनवणारे दिग्दर्शक चंद्र बरोट यांचे निधन झाले आहे. चंद्र बरोट यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता आणि फिल्ममेकर फरहान अख्तर यांनी चंद्र बरोट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
फरहान अख्तर यांची श्रद्धांजली
फरहान अख्तर यांनी चंद्र बरोट यांचा फोटो शेअर करत लिहिले – 'ओरिजिनल डॉन'चे दिग्दर्शक चंद्र बरोट आता आपल्यामध्ये नाहीत, ही बातमी ऐकून दुःख झाले. RIP चंद्र बरोट जी. त्यांच्या कुटुंबाप्रती मनःपूर्वक संवेदना.
7 वर्षांपासून आजारी होते चंद्र बरोट
चंद्र बरोट यांच्या पत्नी दीपा बरोट यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले, "चंद्र बरोट मागील 7 वर्षांपासून पल्मोनरी फायब्रोसिस या आजाराशी झुंज देत होते." त्यांच्यावर गुरु नानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याआधी ते जसलोक हॉस्पिटलमध्येही दाखल होते.
चंद्र बरोट यांची कारकीर्द
चंद्र बरोट यांनी आपल्या सिनेक्षेत्रातील प्रवासाची सुरुवात प्रसिद्ध फिल्ममेकर मनोज कुमार यांच्या सहाय्यक म्हणून केली. त्यांनी पूरब और पश्चिमसारख्या प्रसिद्ध प्रकल्पांवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. डॉनसारख्या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि या सिनेमाद्वारे त्यांनी आपले जवळचे मित्र व सिनेमॅटोग्राफर-निर्माता नरीमन इराणी यांना मदत करण्याचा प्रयत्नही केला.
चंद्र बरोट यांनी दिग्दर्शित केलेल्या काही प्रमुख चित्रपटांमध्ये:
डॉन (मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन) – ही फिल्म एक कल्ट क्लासिक मानली जाते. याच चित्रपटातून चंद्र बरोट यांनी दिग्दर्शकीय पदार्पण केले.
Aashrita (बंगाली चित्रपट)
प्यार भरा दिल
त्यांनी Boss आणि Neil Ko Pakadna या चित्रपटांचंही दिग्दर्शन सुरू केलं होतं, मात्र हे सिनेमे अपूर्णच राहिले आणि कधीच प्रदर्शित झाले नाहीत.
डॉनची लेगेसी पुढेही सुरू
डॉनच्या यशानंतर 2006 मध्ये शाहरुख खानने डॉनचा रीमेक केला आणि या चित्रपटाद्वारे चंद्र बरोट यांच्या ओरिजिनल डॉनला आदरांजली दिली. आता डॉनवर आधारित तिसरा भाग येणार आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि कृति सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या