Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री (TV Actress) दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) तिची प्रेग्नंन्सी आणि आता तिच्या जुळ्या बाळांमुळे (Motherhood Experience) चर्चेत आहे. पती विवेक दहियासोबत जुळ्या मुलांचं स्वागत केल्यापासून, दिव्यांका तिचे अनुभव सातत्यानं चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आता तिनं स्तनपानाविषयी (Breastfeeding) मोकळेपणानं भाष्य केलं असून, या प्रक्रियेत अनेक महिलांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यावर प्रकाश टाकला आहे.
दिव्यांकानं शेअर केली मदरहुड जर्नी (Divyanka Tripathi Motherhood Journey)
एका अलिकडील यूट्यूब व्लॉगमध्ये दिव्यांका त्रिपाठीनं सांगितलं की, आई होऊन जवळपास दोन महिने उलटूनही ती अजूनही स्तनपानाच्या प्रक्रियेला समजून घेण्याचा आणि त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करतेय. अभिनेत्रीनं नमूद केलं की, बाळासाठी आईच्या दुधाचे फायदे यावर लोक वारंवार चर्चा करतात, पण या काळात आईला ज्या शारीरिक आणि मानसिक संघर्षातून जावं लागतं, त्याबद्दल मात्र फारशी चर्चा केली जात नाही.
"बाळाला फायदा होतो..., पण आईचं काय?" (Divyanka Tripathi On Breastfeeding)
दिव्यांकानं ब्रेस्टफिडिंगबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, याबाबत मोकळेपणानं बोललं का नाही जात? तिनं आपला एक्सपीरियंस शेअर करताना म्हटलं की, "बाळाला आईच्या दुधामुळे फायदा होतो, पण आईचं काय?"
"ब्रेस्टफीडिंग... एवढंही सोपं नाही"
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं सांगितलं की, बाहेरून पाहताना ब्रेस्टफीडिंग करणं जितकं सोपं वाटतं, तितकं ते नेहमीच नसतं. बाळानं योग्य प्रकारे 'लॅच' न करणं, स्तनात दूध साचल्यामुळे होणाऱ्या वेदना आणि निपल्सवर होणाऱ्या जखमा किंवा वेदना यांसारख्या समस्या नव्या आईसाठी खूप आव्हानात्मक ठरू शकतात. याव्यतिरिक्त, आपल्याला पुरेसं दूध तयार होत आहे ना? याचीही महिलांना अनेकदा चिंता वाटते.
पाहुण्यांसमोर वेदना लपवाव्या लागतात...
दिव्यांकानं मातृत्वकाळातील अशाच एका आव्हानावर प्रकाश टाकला, ज्याची अनेक महिलांना जाणीव असते. तिनं नमूद केलंय की, घरी पाहुणे आल्यावर वेदना आणि थकवा असूनही महिला अनेकदा हसतमुख राहून आपली भूमिका पार पाडत असतात.
"आई झाल्यानंतर विविध आव्हानांचा सामना..."
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं सांगितलं की, पाहुणे जर दोन-तीन तासांपेक्षा जास्त वेळ थांबले, तर तिच्यासाठी परिस्थिती कठीण होते. अशा वेळी, आपल्याला वेदना होत आहेत, हे समोरच्याला कसं सांगायचं? असा प्रश्न तिला पडतो. दिव्यांकाच्या मते, आई झाल्यानंतर येणाऱ्या अडचणींविषयी महिलांनी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे.
यापूर्वी, दिव्यांकानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या स्तनपानाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली होती. तिनं सांगितलेलं की, जुळ्या मुलांना स्तनपान करताना तिला अनेकदा शंका यायच्या आणि ती स्वतःलाच प्रश्न विचारायची. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला आणि अचूक माहितीमुळे हा प्रवास तिच्यासाठी काहीसा सोपा झाला.
"आई आणि मुल या दोघांकडेही लक्ष देणं आवश्यक..."
विशेष म्हणजे, दिव्यांकासोबतची ही चर्चा महत्त्वाची आहे, कारण ती ग्लॅमरच्या जगापासून दूर राहून मातृत्वकाळातील प्रत्यक्ष आव्हानांबद्दल भाष्य करते. आई आणि मुलं या दोघांच्याही गरजा आणि सोयीसुविधांकडे समान लक्ष दिलं पाहिजे, यावर ती भर देते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
