Disha Salian Death Case High Court Result: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूबाबत सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झालेला. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, म्हणजेच 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झालेला. दरम्यान, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची आणि सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणी केली होती.
सतिश सालियान यांचा जबाब घेऊन सीबीआयला गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे. ज्याच्याविरोधात पुरावे आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई करावी ज्यांच्या विरोधात नाही, त्यांच्या विरोधात नाहीत... पुरावे असताना कारवाई केली नाही किंवा वडिलांचं समाधान झालं नाही, तर निषेध याचिका दाखल करण्याची कोर्टाकडून मुभा देण्यात आलीय, अशी माहिती दिशाच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वात्या मुद्द्यावर बोट ठेवलं, नेमकं काय म्हणाले?
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिशाचे वडील सतिश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, "न्यायालयाने सीबीआयला सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्याचे, एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आणि तपासासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत; तसेच मालवणी पोलीस ठाण्याला सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. शिवाय, पुराव्यांवरून ज्यांचे नाव समोर येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल; याउलट, ज्यांच्याविरुद्ध पुरावा नसेल त्यांना आरोपी केले जाणार नाही. तसेच, जर सीबीआयने नकारात्मक अहवाल सादर केला, तर त्यावर आक्षेप घेण्याचा आणि 'प्रोटेस्ट पिटिशन' (protest petition) दाखल करण्याचा अधिकार आम्हाला राहील. न्यायालयाने आपल्या आदेशात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. मी न्यायालयाचे आभार मानतो."
"एफआयआर काय असतो, फिर्यादी जो देईल त्यांची नाव असतात..., असं व्हायला पाहिजे कारण कायदा तेच सांगतो. आता सीबीआय काय करतंय, काय माहीत? आम्ही लढाई जिंकली... दखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिली असेल तर FIR दाखल करणं बंधनकारक आहे. तक्रार खोटी असेल तर कारवाई करण्याचा अधिकार असतो. आम्ही प्रतिज्ञापत्रावरती तक्रार दिली होती... कोर्टाला वाटलं पोलीस चुकीचे वागले म्हणून तपास CBI ला वर्ग झालाय...", असं वकील निलेश ओझा म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "14 व्या मजल्यावर पडून पण तिचा एकच दात तुटला हे शक्य आहे? बॉडी 25 फूट दूर पडली, असे अनेक तपासात घोळ होते. आत्तापर्यंत ADR ची चौकशी सुरू होती, जो त्यांना अधिकार नाही... गुन्हा दाखल केला असता तर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून गुन्हा दाखल केला असे आरोप झाले असते, ही तर फक्त सुरुवात आहे, सीबीआयकडे आम्ही ऑर्डर घेऊन जातोय, गुन्हा दाखल होणार..."
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वकिलांनी काय सांगितलं? VIDEO
महत्त्वाच्या इतर बातम्या :
