गोळीबार झाल्यामुळे दिशा पटानीच्या शेजाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण, गल्लीच्या मुख्य दरवाजावर मोठं गेट बसवलं
Disha Patani : गोळीबार झाल्यामुळे दिशा पाटनीच्या शेजाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण, गल्लीच्या मुख्य दरवाजावर मोठं गेट बसवलं

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या (Disha Patani) घरावर 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हे दोघेही बाईकवर आले आणि घरावर अनेक ठिकाणी फायरिंग करून पळून गेले. या घटनेनंतर दिशा पाटनीच्या (Disha Patani) कुटुंबीयांसह शेजाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गल्लीतल्या मुख्य दरवाज्यावर लोखंडी गेट बसवण्याचे काम सुरू असून ते वेगाने सुरू आहे.
सुरक्षा वाढवण्यासाठी घेतलेले उपाय
दिशा पटानीच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गल्लीतल्या मुख्य प्रवेशद्वारावर मजबूत लोखंडी गेट बसवले जात आहे. या दरम्यान एसपी सिटीसह अनेक वरिष्ठ अधिकारी दिशा पाटनी यांच्या घरात उपस्थित होते. याशिवाय दिशा पाटनीच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांनी तपासणी केली. क्षेत्राधिकारी आशुतोष शिवम यांनी अनेक घरांबाहेर व दुकानांबाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले.
पोलिस अधीक्षक काय म्हणाले?
पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, 12 सप्टेंबर रोजी निवृत्त सीओ जगदीश पाटनी यांच्या घरावर दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला. यानंतर एसपी सिटी, एसओजी व सर्व्हेलन्स टीम लगेच घटनास्थळी पोहोचली. तपास झाल्यानंतर तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला जात आहे.
पोलिसांनी कळवले की सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे आणि हल्लेखोरांची ओळख लवकरच पटेल. कुख्यात गँगस्टर रोहित गोदारा यांनी या हल्ल्याची जबाबदारी सोशल मीडियावर स्वीकारली आहे. त्याने म्हटले आहे की हा हल्ला प्रेमाानंद महाराज आणि अनिरुद्ध महाराज यांच्याबाबत दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने केलेल्या कथित वक्तव्याचा बदला म्हणून करण्यात आला आहे. पोस्टमध्ये नमूद करण्यात आले की खुशबूच्या वक्तव्यामुळे संतापून हा हल्ला केला गेला.
दिशा पाटनींच्या वडिल काय म्हणाले?
दिशा पाटनींचे वडील जगदीश पाटनी यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, दोन अज्ञात लोक बाईकवर आले आणि त्यांच्या घरावर गोळीबार करून पळून गेले. त्यांनी सांगितले की स्थानिक पोलिस, एसएसपी, एडीजीसह संपूर्ण पोलिस यंत्रणा या प्रकरणात सक्रिय आहे आणि अनेक तपास पथके काम करत आहेत. मिळणारी प्रत्येक माहिती वेळेवर सार्वजनिक केली जाईल. त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांचा कुणाशीही कोणताही वैयक्तिक वाद किंवा शत्रुत्व नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















