Director Vivek Agnihotri : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. आता त्याने मराठी लोकांच्या खाद्य संस्कृतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. "मी दिल्लीहून आलो होतो. तिकडे बटर चिकन, कबाब, तंदुरी अशा प्रकारचं मसाले असलेलं जेवण मी करायचो. आता हे म्हणाले वरण भात खा.. माझं नवीन लग्न झालं होतं. मी म्हणालो चला खाऊया वरण भात.. नंतर म्हणाले कडी खावा. मला वाटायचं कडी म्हणजे त्याच्यावर तुप वगैरे असेल.. मराठी लोकांची कडी खावी तर हेल्थ फुड असल्याप्रमाणे आहे. मी म्हणालो हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब जेवण करतात", असं विवेक अग्निहोत्री म्हणालाय. दरम्यान, विवेक अग्निहोत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी त्याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय.
विवेक अग्निहोत्री हे भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहे. त्याने आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजन शोमधून केली होती. ये कहाँ आ गए हम (1996) आणि एक्स-झोन (2000) या मालिकांपासून त्याने दिग्दर्शनाला सुरुवात केली. विवेक यांनी बॉलिवूडमध्ये चॉकलेट – डीप डार्क सिक्रेट्स (2005) या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी धन धना धन गोल (2007) आणि हेट स्टोरी (2012) यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले.
विवेक अग्निहोत्रीचा जन्म 10 नोव्हेंबर 1973 रोजी डॉ. प्रभूदयाल अग्निहोत्री आणि शारदा अग्निहोत्री यांच्या घरी झाला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) मधून शिक्षण घेतले तसेच हार्वर्ड एक्स्टेन्शन स्कूल मधून अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट विषयातील सर्टिफिकेट ऑफ स्पेशल स्टडीज पूर्ण केले. त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण चॉकलेट (2005) या चित्रपटाद्वारे केले, जो द युज्युअल सस्पेक्ट्स (1995) या हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक होता. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला आणि नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. त्यांचा पुढील प्रकल्प धन धना धन गोल हा यूकेमधील एका सर्व-एशियन फुटबॉल टीमवर आधारित होता.
हेट स्टोरी (2012) हा त्यांचा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या व तो मध्यमगतीने यशस्वी झाला. बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम (ज्यात त्यांच्या पत्नी पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत होत्या) आणि जुनूनियत (2016) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालले नाहीत. झिद चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या तरीही तो व्यावसायिकदृष्ट्या ठीकठाक चालला. द ताश्कंद फाईल्स – हू किल्ड शास्त्री? या चित्रपटाला समीक्षकांनी नकारात्मक अभिप्राय दिले, पण तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि अनपेक्षितपणे बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. अलीकडचा त्याचा चित्रपट द काश्मीर फाईल्स हा आहे. यात 1990 मध्ये काश्मीर सोडून जावे लागलेल्या काश्मीरी पंडितांच्या हालअपेष्टांचे चित्रण केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.
इतर महत्त्वाच्या बातम्या