Director Priyadarshan And Ex Wife Lissy Living Together: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अशी अनेक जोडपी आहेत, जी घटस्फोटानंतरही (Divorce) एकमेकांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध जपत आहेत. अशातच सध्या अशाच एका नव्या जोडप्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन आणि ज्येष्ठ अभिनेत्री लिसी लक्ष्मी (Lissy Lakshmi) यांची. तसं पाहायला गेलं तर या दोघांनी कधीकाळी एकमेकांसोबत सातजन्म राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या. पण, लग्नाच्या काही वर्षांनी दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला. दोघांना वेगळं होऊन आता जवळपास 10 वर्ष उलटलीत, पण आता पुन्हा एकदा हे जोडपं एकत्र दिसतंय. दिग्गज दिग्दर्शक सिबी मलयिल (Veteran Director Siby Malayil) यांच्या मुलाच्या लग्नात हे दोघे एकत्र दिसून आले. त्यांना पुन्हा एकत्र पाहून दोघेही पुन्हा संसार थाटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सुप्रसिद्ध सिनेनिर्माते प्रियदर्शन (Director Priyadarshan) सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'भूत बंगला' (Bhoot Bangla) मुळे चर्चेत आहेत. याच दरम्यान, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. प्रियदर्शन यांनी पत्नी लिसीपासून साधारणतः दहा वर्षांपूर्वी वेगळे झालेले. पण, आता दोघेही पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान, दोघेही एकत्र दिसून आलेत त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. अनेकदा नातं तुटल्यानंतर जोडपी एकमेकांपासून दुरावतात, पण या जोडप्यानं काळाच्या ओघात आपल्या नात्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहणं पसंत केलं आणि अखेरीस पुन्हा एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
प्रियदर्शन पुन्हा लग्न करणार? (Is Director Priyadarshan Going To Get Married Again?)
'मिड डे'(Mid-Day) शी बोलताना प्रियदर्शन यांनी सांगितलं की, ते आणि लिसी गेल्या काही काळापासून पुन्हा एकत्र राहत आहेत. पण, अजून पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. प्रियदर्शन यांनी सांगितलं की, लग्नाच्या कायदेशीर कागदपत्रांचा भाग बाजूला ठेवल्यास, ते आता अगदी पूर्वीप्रमाणेच एकत्र राहत आहेत. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, त्यांच्यासाठी हे नातं आता औपचारिक बंधांपेक्षा परस्पर सामंजस्य, मैत्री आणि सहवासावर अधिक आधारित आहे. या निर्णयामध्ये त्यांची मुलं, अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अहंकारामुळे मोडलेला सुखी संसार
दिग्दर्शक प्रियदर्शन आणि ज्येष्ठ अभिनेत्री लिसी यांच्या नात्याबाबत बोलायचं झालं तर दोघांनी 1990 मध्ये लग्न केलेलं आणि तब्बल 24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वेगळे झाले. दोघांनी 2014 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये कायदेशीरित्या घटस्फोट घेतला. लिस्सी यांनी मीडियाला दिलेल्या एका वृत्तामध्ये सांगितलेलं की, त्यांचं वेगळं होणं फारच कठीण आणि तणावपूर्ण होतं. ज्यामध्ये कित्येकदा कायदेशीर लढायांचाही समावेश होता. तर, प्रियदर्शन यांनीही मान्य केलेलं की, त्यांच्या नात्यात 'ईगो'मुळेच मिठाचा खडा पडला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
