एक्स्प्लोर

Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?

Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest Pune Marathi News: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद देखील आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या.

Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest Pune Marathi News: पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरु असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा (MPSC Protest Pune) आज नववा दिवस आहे. काल पुणे पोलिसांनी एस.एम जोशी पूल मोकळा करा, असं आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितलं. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आंदोलनावर ठाम आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Dipali Sayyed) देखील आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या. मी एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी याठिकाणी आली आणि तुम्हाला पाठिंबा दिला. तुमच्या मागण्या आगामी 2 दिवसांत नक्की पूर्ण होतील, असं दीपाली सय्यद म्हणाली. मात्र दीपाली सय्यदच्या भाषणावेळी काहीकाळ गोंधळ पाहायला मिळाला. मात्र चर्चेत आलेले विद्यार्थी विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.

राज्य सरकार सर्व सामान्यांचं सरकार आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅडव्होकेट आहेत. तुम्हाला ते नक्कीच न्याय देतील, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. दीपाली सय्यदच्या या विधानानंतर एकच गोंधळ झाला. यानंतर विद्यार्थ्यांनी दीपाली सय्यद यांना बोलू दिले नाही. मात्र विवेकानंद पाटील याने मध्यस्थी करत आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढली. आधी पूर्ण ऐका, नंतर प्रतिक्रिया व्यक्त करा...असं विवेकानंद पाटील म्हणाला. यानंतर मी तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार...मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचवणार...एकनाथ शिंदे तुमच्यासाठी काम करणार...असं आश्वासन दीपाली सय्यद यांनी दिलं. विद्यार्थी जगला तर महाराष्ट्र आणखी मोठा होईल. मला खरंच मनापासून वाटतं, तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. सगळं काही ठीक होईल, तुम्हाला या दोन दिवसांत निकाल समोर येईल. तुम्ही अजिबात काळजी करु नका. मी एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी याठिकाणी आली आणि तुम्हाला पाठिंबा दिला, असंही दीपाली सय्यद यांनी सांगितलं. (Dipali Sayyed MPSC Protest Pune)

विवेकानंद पाटील काय म्हणाला? (Vivekanand Patil)

तुम्ही इकडे आल्याबाबत दीपाली सय्यद यांचे आभार...तुम्ही सरकारमध्ये असूनही विद्यार्थ्यांसाठी धावून आल्यात. ताई आमच्या आहेत. आम्हाला अर्बन नक्षलवादी म्हणाले, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये राग आहे. तुम्ही आमचा आवाज पोहोचवा, असं विवेकानंद पाटील यांनी सांगितलं. आपलं इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र एकही कलाकार आंदोलनस्थळी आला नाही. त्यामुळे त्यांचं पुढे काय करायचं ते आम्ही बघू...तुम्ही (दीपाली सय्यद) आलात, त्यासाठी तुमचे आभार..असं विवेकानंद पाटील म्हणाले. तसेच तुम्ही हा राग तुमच्यावर आहे, असं समजू नका..विद्यार्थ्यांचा हा राग सरकारवर आहे, असंही विवेकानंद पाटीलने सांगितले. त्याचप्रमाणे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा झाल्यास आम्ही एपस्टीन फाईल्स हाऊसफुल्ल करुन बघू...पण तुम्ही चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आणा...आम्हाला पण खरातबाबा कोण आहे, हे बघायचं आहे, असं मिश्किल विधान विवेकानंद पाटीलने केलं. 

तातडीने आंदोलनाची जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश- (MPSC Protest Pune Marathi News)

एस. एम. जोशी पूल, पत्रकार भवनाजवळ सुरू असलेल्या धरणे आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलनस्थळ तात्काळ रिकामे करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. आंदोलकांनी पर्यायी ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने नियोजित धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचं पत्रही देण्यात आलं होतं. त्यामुळे यापूर्वी आंदोलनासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

MPSC Protest Pune Marathi News: रोहित पवारांच्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील 7 पैकी 3 जणांनी उपोषण सोडलं; धक्कादायक कारण समोर

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Embed widget