Diljit Dosanjh Concert: बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या कॅनडामधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ उडाला. दिलजीतच्या Aura 2026 कॉन्सर्ट सुरू असताना काही खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली . त्यांनी भारत विरोधी घोषणा देत दिलजीतला बीजेपी आणि आरएसएसचा एजंट असल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. कॉन्सर्ट सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे आजूबाजूचे वातावरण तणावाचे झाले होते. सुरक्षारक्षकांनी खलिस्ताने समर्थकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली. काहींनी झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. दिलजीतच्या पुढील कार्यक्रमांमध्येही असाच देते आणण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. (Diljit Dosanjh)

Continues below advertisement

नेमकं घडलं काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी दिलजीत दोसांझ याच्या कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ घातला. कॅनडामधील लाइफ कॉन्सर्ट सुरू असताना काहीजणांनी जोरजोरात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. दिलजीत दोसांझ बीजेपी आणि आरएसएस चा एजंट असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.यावेळी आजूबाजूचे वातावरण प्रणव पूर्ण झाले होते.सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच खलिस्तान समर्थकांनी धक्काबुक्की केली. दिलजीतच्या पुढील कॉन्सर्टमध्ये असा गोंधळ घालण्याची धमकीही त्यांनी दिली. दिलजीत परदेशात राहणाऱ्या शीख समुदायाला BJP आणि RSS चहाजवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनात पवनदीप सिंह बस्सी, आणि मनदीप सिंह रवी हे दोघे सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही शीख फॉर जस्टिस या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Continues below advertisement

यापूर्वीही केलंय दिलजीतला लक्ष्य

यापूर्वीही सिख फोर जस्टिस आणि खलिस्तान समर्थकांनी दिलजीत दोसांझ याला अनेकदा लक्ष्य केलं आहे . 2025 मध्ये कोण बनेगा करोडपतीच्या प्रोमो मध्ये अमिताभ बच्चन यांचे पाय स्पर्श करतानाही त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर सिडनी आणि मेलबर्नमध्ये झालेल्या त्याच्या कॉन्सर्ट मध्ये खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला होता. या घटनेमुळे परदेशात होणाऱ्या भारतीय कलाकारांच्या कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.