diana penty : बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटी (diana penty) फक्त अभिनयासाठीच नव्हे तर तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. अलीकडेच तिने हिंदी सिनेमात दीर्घकाळापासून चालत आलेल्या दुटप्पी मानसिकतेविरुद्ध आपली भूमिका मांडली. तिने (diana penty) सांगितले की, महिला कलाकारांना त्यांच्या कौशल्यापेक्षा जास्त त्यांच्या सौंदर्याकडे पाहिले जाते आणि  वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर त्यांना दुर्लक्षित केले जाते. (diana penty) तसेच, अभिनेत्रींसाठी असे रोल लिहिले जातात जे त्यांच्या खऱ्या क्षमतेला वाव देत नाहीत.

Continues below advertisement

हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना डायना पेंटी म्हणाली, “जेव्हा तुमची स्टेजवर ओळख करून दिली जाते, तेव्हा नेहमी ‘सर्वात सुंदर’ आणि ‘सर्वात आकर्षक’ असं म्हटलं जातं. यात खोलीचा अभाव असतो. लोक आदराने तुमच्या सौंदर्याचं कौतुक करतात ही चांगली गोष्ट आहे, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला वाटतं की चर्चा त्यापलीकडेही व्हावी.”

फक्त सौंदर्यासाठी ओळख नको

डायना पुढे म्हणाली, “तुम्हाला एक अभिनेत्री म्हणून फक्त सौंदर्यासाठी नव्हे तर तुमच्या कलेसाठी आणि अभिनयासाठीही ओळखलं जावं असं वाटतं. आमच्यात अजून खूप काही आहे. ‘सुंदर’ किंवा ‘आकर्षक’ म्हणणं छान आहे, पण तेवढ्यावर भागत नाही.”

Continues below advertisement

हिरोईनला मिळतात 3 मुलांच्या आईचे रोल

जेव्हा हा मुद्दा पुढे आला की चित्रपटांमध्ये अनेक अभिनेते 60 वर्षांच्या वयातही हिरोची भूमिका करतात, तर महिला कलाकारांना 30 वर्षांतच आईच्या भूमिकेत मर्यादित केलं जातं, तेव्हा डायनाने मध्येच म्हणाली – “तीन मुलांची आई.” त्यानंतर तिला विचारलं गेलं की महिला कलाकार या परिस्थितीशी कशी झुंजतात?

डायना पेंटीने सांगितला सामोरे जाण्याचा मार्ग

त्यावर डायना म्हणाली, “ही काही लढाई नाही, तर असं काही आहे ज्यात आम्ही सहभागी होण्याचाही प्रयत्न करत नाही. खरी गोष्ट अशी आहे की, काळानुसार हे असंच चालत आलंय आणि लोकांनी ते मान्य केलंय. मग असं वाटतं की तुम्ही कोण आहात मध्ये पडणारे? मी कधी याविरुद्ध लढले नाही, पण मी स्वतः ठरवलं की मला अशा गोष्टींचा भाग व्हायचं की नाही. माझ्या मते, याला सामोरं जाण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे.”

इतर महत्त्वाच्या बातम्या

Blood Donation Camp On PM Narendra Modi Birthday: 'हा दिवस आपल्यासाठी खास', अभिनेता विवेक ओबेराय घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प