Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest: सलमान खानपासून (Salman Khan) आलिया भट्टपर्यंत सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक कलाकार मैदानात उतरले आहेत. पेपर फुटी प्रकरणावरुन देशातील युवक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज करण्यात आला (Dia Mirza). याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी अनेक कलाकारांनी पोलिसांच्या वागणुकीचा निषेध नोंदवला (Narendra Modi). पण कोणत्याही कलाकाराने अद्याप विद्यार्थ्यांच्या मागण्यावरुन सरकारला प्रश्न विचारलेला नाही.    अशातच स्टुटेंड प्रोटेस्टच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री दिया मिर्झा हिनं पोस्ट शेअर केली आहे (Entertainment). या पोस्टमधून तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिखट शब्दांत सवाल उपस्थित केला आहे.   

Continues below advertisement

शुक्रवारी दिया मिर्झाने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं, नीट पेपरफुटीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्टेटमेंटवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी, नीट पेपर फुटी प्रकरण गंभीर असून,  यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची सूचना दिल्याचे सांगितले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्टेटमेंटवर दियाने  प्रतिक्रिया दिली आहे. तिनं  त्यांच्या भाषणात सहानुभूतीचा अभाव असल्याचं सांगत टीका केलीये. 

दीया मिर्झाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Dia Mirza reaction on NEET protest)

दीया आपल्या पोस्टमध्ये म्हणलाी की, 'ज्या पालकांना आपल्या मुलांना गमवावे लागले आहे.   ज्या मुलांचा यामुळे मृत्यू झाला आहे.  आपले हक्क आणि मागण्यांसाठी लढणारे विद्यार्थी, सोनमजी  तसेच इतर विद्यार्थी जे उपोषणावर आहेत, त्यांच्याबद्दल एकही सहानुभूतीचा शब्द नाही. सर, हे किती कठीण आणि त्रासदायक असू शकते', असं दिया मिर्झा म्हणाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर उशीरा दिलेल्या प्रतिक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.  'तुम्हाला काहीतरी बोलायला 47 दिवस लागले. आणि जेव्हा तुम्ही बोललात तर,  तेव्हा तुम्ही काहीच नाही बोललात.  असं काहीच नाही, जे लाखो दुखावलेल्या हृदयांना बरे करु शकेल',  असं दिया म्हणाली.  दिया मिर्झाने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या स्टेटमेंटवर टीका केली आहे.  पंतप्रधान मोदी यांच्यासमोर थेट प्रश्न उपस्थित केल्याबद्दल तिचं कौतुक होत आहे.  नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करुन तिचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मुख्यमंत्र्यांच्या 'जना नायकन'ने दुसऱ्या दिवशी कमावले 'इतके' कोटी; चित्रपटावर पडला पैशांचा पाऊस, लवकरच 100 कोटी गाठणार