Ranveer Singh Dhurandhar 2 action packed teaser release: बहुप्रतिक्षित धुरंधर : द रिव्हेंज या धमाकेदार चित्रपटाचा टीझर काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झाला. धुरंधर या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर निर्मात्यांनी भाग 2 ची घोषणा केली होती. चाहते आणि प्रेक्षक दुसऱ्या भागाची झलक पाहण्यासाठी नवीन टीझर आणि ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटाचा धुवांधार टीझर नुकताच समाजमाध्यमांमध्ये रिलीज झाला आहे. सोमवारी, या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी घोषणा केली की, धुरंधर 2 चा टीझर मंगळवारी 12:12 वाजता प्रदर्शित होईल. आज या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून, काही मिनिटांत व्हायरल झाला आहे. या सिनेमातून रणवीरचा तोच राऊडी अंदाज पाहायला मिळत आहे.
अभिनेता रणवीर सिंह याने आज सकाळी धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. या पोस्टरमध्ये रणवीरच्या चेहऱ्यावर सुडाची भावना, लाल भडक रंग आणि पाऊस पाहायला मिळत आहे. रणवीरचा अत्यंत हिंसक लूक दिसत आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर टीझर कधी रिलीज होईल, असा प्रश्न प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, आज दुपारी 12:12 वाजता सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.
1 मिनिट 12 सेकंदाच्या या टीझरची सुरूवात रणवीर सिंहने होते. यात त्याचा वेगळा लूक दिसून येत आहे. ब्राऊन डोळे, लहान केस आणि हातात बंदूक असलेला रणवीरचा लूक पूर्ण वेगळा आणि भयानक दिसत आहे. यानंतर रणवीरचा हमजा अली मजारीचा लूक पाहायला मिळतो. बंदुकीतून गोळीबार आणि हत्या, हे सर्व टीझरमधून पाहायला मिळत आहे. अॅक्शन आणि हिंसाचाराने भरलेल्या या टीझरला भन्नाट म्युझिक देण्यात आला आहे. टीझरमध्ये असे दिसून येते की, ही कथा दोन भागात विभागली जाईल, ज्यामध्ये रणवीर सिंहचा गुप्तचर एजंट बनण्यापासून ते पाकिस्तान पोहोचण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येण्याची शक्यता आहे.
टीझरमध्ये अर्जून रामपाल, संजय दत्त तसेच आर माधवन या कलाकारांचीही झलक पाहायला मिळत आहे. टीझरच्या शेवटी रणवीर सिंह 'ये नया हिंदुस्तान है ये घर में घुसेगा भी और मारेगा भी' असा डायलॉग बोलताना दिसत आहे. धुरंधर चित्रपटाच्या शेवटी देखील रणवीर सिंह 'ये नया हिंदुस्तान है ये घर में घुसेगा भी और मारेगा भी' हा डायलॉग बोलताना दिसत आहे.
