Rakesh Bedi rejected Uri The Surgical Strike: 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटामुळे राकेश बेदी (Rakesh Bedi) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात राकेश बेदींनी जमील जमालीची भूमिका साकारली आहे. 'धुरंधर 2' चित्रपटातील क्लायमॅक्समधील जबरदस्त ट्वीस्टने सर्वांना धक्का दिला असून, त्यांना आता चित्रपटाचा खरा नायक म्हटले जात आहे. दरम्यान, अलिकडेच राकेश बेदींनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आदित्य धरचा चित्रपट नाकारला होता, असं राकेश बेदी म्हणाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. आदित्य धरचा नेमका कोणता सिनेमा राकेश बेदींनी नाकारला होता? पाहूयात.
अलिकडेच फराह खानने राकेश बेदींच्या घरी भेट दिली होती. तिच्या व्लॉगसाठी गेली होती. यावेळी तिचा कूक देखील फराहसोबत होता. या भेटीदरम्यान, फराह खानने राकेश बेदींसोबतच्या तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राकेश बेदींनी अनेक किस्से शेअर केले. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला होता. जेव्हा आदित्य धरने या सिनेइंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले होते, तेव्हा दिग्दर्शक धरने राकेश बेदींकडे आगामी चित्रपटाच्या रोलसाठी विचारणा केली होती.
राकेश बेदींनी नाकारला होता आदित्य धरचा चित्रपट (Rakesh Bedi rejected Uri The Surgical Strike)
दरम्यान, राकेश बेदींनी तो रोल नाकारला होता. मात्र, नंतर होकार दिला. राकेश बेदी म्हणतात, 'मला धुरंधर 2 चित्रपट मिळाला, त्यासाठी खरंतर माझी मुलगी जबाबदार आहे. गोष्ट अशी आहे की, मी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' करायला तयार नव्हतो, कारण त्यात सर्बियामधील फक्त एकच सीन होता. मी नकार दिला, पण माझी मुलगी म्हणाली, 'बाबा, तो एक नवीन दिग्दर्शक आहे आणि खूप प्रोमिसिंग वाटत आहे, त्यामुळे प्लिज हा चित्रपट करा', हा किस्सा राकेस बेदींनी शेअर केला.
यानंतर राकेश बेदींची पत्नी म्हणते, 'तुम्ही नव्या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही, हे काही चांगलं नाही', यावर त्यांची मुलगी, 'आम्हाला मग कोण काम देणार?', असं म्हणते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
रितेश बनलाय शिवराय तर संजय दत्त अफजलखान; 'राजा शिवाजी' चित्रपटात कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत?
