Dhurandhar Actor Ranveer Singh Video Viral: काही महिन्यांपूर्वी मनोरंजन विश्वात (Entertainment World) एका विषयानं वादळं उठलेलं, तो म्हणजे, दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) केलेली आठ तासांच्या शिफ्टची मागणी (Deepika Padukone Demand Eight Hour Shift). बॉलिवूडच्या (Bollywood News) टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दीपिका पादुकोणनं आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली आणि अख्खं सिनेविश्व ढवळून निघालं. दीपिकाच्या हातून अनेक प्रोजेक्ट्स गेले. अनेकांनी तिच्या वक्तव्याचा विरोध केला. कित्येकांनी तिला ट्रोलही केलं. पण, तरिसुद्धा दीपिका मात्र तिच्या मागणीवर ठाम होती. काहींनी दीपिकाची बाजूही समजून घेतली. तिला पाठींबा दिला. पण, आता तिचा पती रणवीर सिंहचं (Ranveer Singh) एक वक्तव्य व्हायरल होत आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. जिथे जवळपास अख्खं सिनेविश्व दीपिकाच्या मागणीचा विरोध करत असतानाच निदान रणवीर सिंहनं तरी तिला पाठींबा द्यायला हवा होता, पण त्याच्या व्हायरल व्हिडीओवरुन रणवीर सिंह पत्नी दीपिकाच्या मागणी विरोधात तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दीपिका आणि रणवीर यांची मुलगी 'दुआ'चा जन्म झाला आणि काही काळासाठी दीपिकानं सिनेविश्वातून ब्रेक घेतला. पण, त्यानंतर तिच्या कमबॅकवेळी तिनं फक्त आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली. त्यावेळी मात्र, तिला मोठा विरोध झाला. दीपिका प्रभाससोबत 'स्पिरिट'मध्ये झळकणार होती. त्याचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. पण, त्यानंतर तिची या प्रोजेक्टमधून हाकालपट्टी झाली. त्यापाठोपाठ आठ तासांच्या शिफ्टच्याच मागणीमुळे तिला 'कलकी 2898 एडी पार्ट 2'सारख्या प्रमुख चित्रपटांनाही मुकावं लागलं.
दरम्यान, तिनं आठ तासांपेक्षा जास्त शुटिंग करू नये, अशी मागणी केलेली. त्यानंतर तिला प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं. अनेक सिने कलाकारांनीही या विषयावर भाष्य केलं. काहींनी दीपिकाच्या समर्थनार्थ वक्तव्य केली, तर काहींनी तिच्या मागणीवर टीका केली. आता, रणवीर सिंहचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो याच विषयावर चर्चा करताना दिसतोय.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणालाय रणवीर सिंह?
रणवीर सिंहचा व्हायरल व्हिडीओ दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीच्या खूप आधीचा आहे. त्याला एका मुलाखतीत कामाच्या तासांबाबत विचारल्यावर तो म्हणाला की, "बरेच लोक माझ्याकडे तक्रार करतात. इतर आर्टिस्ट आणि त्यांचे मॅनेजमेंट म्हणतात की,"अरे यार तू सर्वांना बिघडवतोयस... सगळे म्हणतात, "तुम्ही 8 तासांच्या शिफ्टमध्ये 10-12 तास शूट करता... मग आम्हालाही करावी लागते..."
आठ तासांपेक्षा जास्त शुटिंग करा ना... : रणवीर सिंह
रणवीर सिंह पुढे म्हणाला की, "पण आता, जर आपल्याला 8 तासांत जे हवं आहे, ते मिळालं नाही, तर ठीक आहे, तुम्ही थोडं जास्त शूट करा ना... मी असा माणूस नाही, जो त्याला व्यवहार म्हणून पाहतो..." रणवीर सध्या त्याचा नवा सिनेमा 'धुरंधर'साठी चर्चेत आहे. काही काळापूर्वी, चित्रपटाचं दिग्दर्शक आदित्य धर यांनी खुलासा केला की, कलाकारांसह संपूर्ण चित्रपटाच्या टीमनं 1.5 वर्ष 16-18 तास काम केलंय, कोणतीही तक्रार न करता..."
रणवीर सिंहनं त्याचे 100 टक्के दिलेत : आदित्य धर
दिग्दर्शक आदित्य धर म्हणाला की, "आम्ही सलग दीड वर्ष दिवसाचे 16-18 तास काम केलंय. कामाच्या ताणाबद्दल कोणीही तक्रार केली नाही. रणवीर सिंहसह सर्वांनी त्यांचे 100 टक्के दिलेत..." दरम्यान, रणवीरच्या जुन्या वक्तव्याची आणि आदित्यच्या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :