Dhurandhar Actor Danish Pandor Girlfriend: 'धुरंधर' सिनेमातली (Dhurandhar Movie) पात्रं आणि कलाकारांनी या वर्षी बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) भावाची भूमिका साकारणारा अभिनेता दानिश पांडोरनं (Danish Pandor) उजैर बलोचची (Uzair Baloch) भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. अलिकडेच, एका सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीसोबत (Bollywood Actress) दानिशचे फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे चाहते त्यांच्या नात्याबद्दल अंदाज लावू लागले आहेत.
काही दिवसांपूर्वीच 'धुरंधर'मधला उजैर बलोच म्हणजेच, दानिश पांडोरचा वाढदिवस होता. त्यावेळी बॉलिवूडच्या एका सौंदर्यवतीनं दानिशसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट करुन एक नोटही लिहिली होती.
'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये (Rise & Fall Reality Show) दिसलेल्या आहाना कुमरानं, पांडोरसोबत तिनं घालवलेल्या व्हेकेशन आणि पार्ट्यांचे फोटो शेअर केलेले. त्यासोबतच तिनं एक कॅची आणि लवीडवी पोस्टही लिहिलेली, "माझ्या ओळखीतला सर्वात गोड मुलाला... खूप खूप शुभेच्छा... तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मी आशा करते आणि प्रार्थना करते. आयुष्य नेहमीच तुमच्यावर उदार राहो आणि तुम्ही ज्या प्रेमाचे, यशाचे आणि आनंदाचे पात्र आहात, ते तुम्हाला मिळो... सदैव शुभेच्छा. डॅनी बॉय, हे वर्ष खूप छान जावो..."
कुमरानं यापूर्वीही केलेल्या कौतुकाच्या पोस्ट
5 डिसेंबरला, 'धुरंधर' रिलीज होण्याच्या सुमारास, आहानानं गेल्या वर्षी धुरंधरच्या सेटवर दानिशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील रणवीर आणि आदित्यसोबतचे काही फोटो शेअर केलेले. तिनं सिनेमाचे आणि पांडोरच्या अभिनयाचं कौतुक करताना लिहिलेलं की, 'धुरंधर' अखेर प्रदर्शित झाला आहे, आणि माझं आनंद गगनात मावेनासा झालाय. दीड वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ मिळालंय, आणि हा किती अद्भुत चित्रपट आहे! रणवीर सिंह, असं काही आहे का जे तुम्ही करू शकत नाही? प्रत्येक फ्रेम उत्साहवर्धक आहे! अक्षय खन्ना अद्भुत आहेत! संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि राकेश बेदी सर, या सर्वांनी उत्कृष्ट अभिनय केलाय..."</p
जे कुणाला नाही दिसलं, तेच नेमकं नेटकऱ्यांनी हेरलं...
या फोटो आणि कॅप्शनवरून चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. याशिवाय, फोटोंमधील पोझमुळे चाहत्यांना असं मानण्यास प्रोत्साहित केलं आहे. दानिश आणि आहानानं अद्याप अधिकृतपणे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण, दोघांच्या एकमेकांबाबतच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. 'धुरंधर'च्या आधी, दानिश पांडोरनं 2025 चा ब्लॉकबस्टर सिनेमा 'छावा' आणि नेटफ्लिक्सवरची लोकप्रिय वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'मध्ये काम केलेलं. आहाना कुमरा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा', 'इंडिया लॉकडाऊन', 'युद्ध', 'कॉल माय एजंट: बॉलिवूड आणि इनसाइड एज' यासह अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसली आहे. दोघांनी सप्टेंबर 2015 ते एप्रिल 2016 पर्यंत प्रदर्शित झालेल्या क्राईम फिक्शन अँथॉलॉजी टीव्ही सीरिज 'एजंट राघव - क्राइम ब्रांच' मध्ये देखील एकत्र काम केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
