Continues below advertisement

Dhurandhar 5 Actors Will Not Return in the Sequel: धुरंदर सध्या जगभरात डंका वाजवतोय. या चित्रपटाने काही आठवड्यातच छप्परफाड कमाई केली. रणवीर सिंहसह तगडे कलाकारांनी जबरदस्त काम केलंय. फक्त भारतातच नव्हे तर या चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानमध्येही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 18 दिवस झाले आहेत. पण अजूनही या चित्रपटाची धुवांधार कमाई सुरूये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने वर्ल्डवाइड 870 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा दुसरा पार्ट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग 16 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये 5 कलाकार दिसणार नाहीयेत. ते कलाकार नेमके कोण आहेत जाणून घेऊयात.

रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन अशी तगडी स्टार असलेला धुरंधर अजूनही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सारा अर्जुन आणि सौम्या टंडन यांनी देखील जबरदस्त अॅक्टिंग केली. यांसह अनेक सहाय्यक कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवले आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु, दुसऱ्या सिक्वेलमध्ये अभिनेता अक्षय खन्नासह 4 कलाकार दिसणार नाही.

Continues below advertisement

धुरंधर 2 मध्ये कोणते 5 कलाकार दिसणार नाही?

नवीन कौशिक (डोंगा)

धुरंधर चित्रपटात नवीन कौशिक याने रहमन डकैत (अक्षय खन्ना) च्या राईट हँडची भूमिका साकारली होती. नवीन कौशिकने या चित्रपटात डोंगा नावाची व्यक्तीरेखा साकारली. या चित्रपटात त्याचे रणवीर सिंहच्या हमजा या पात्राशी खास मैत्री होती. डोंगाने क्लायमॅक्स सीनमध्येही चांगली कामगिरी केली. जिथे संजय दत्तच्या एन्ट्रीनंतर रहमान डकैत जंगलात पळून जातो. त्यानंतर तेथील परिस्थिती हाताळण्यासाठी डोंगा पोलिसांशी दोन हात करतो. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात डोंगा जखमी होतो. यातच त्याचा मृत्यू होतो.

रहुल्लाह गाझी (स्याही)

स्याही रहमान डकैतच्या टीमचा सदस्य होता. क्लायमॅक्सच्या सीनमध्ये स्याही रणवीरसोबत झटापट करतो. शेवटी हमजा (रणवीर) स्याहीला मारतो. यात त्याचा अंत होतो.

हितुल पुजारा (नईम बलोच)

हितुल पुजाराने या चित्रपटात रहमान डकैतच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात हितुल (नईम बलोच) वर प्राणघातक हल्ला होतो. नईम एका लग्न समारंभात जातो. यावेळी त्याच्यावर हल्ला होतो. हमजा (रणवीर) त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, गोळीबारात त्याचा मृत्यू होतो. नईमचे प्राण वाचवून हमजा रहमानच्या टोळीत सहभाग होण्यासाठी प्रयत्न करत असतो.

आसिफ अली हैदर खान (बाबू डकैत)

आसिफ अली हैदर खान याने रहमान डकैतच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात रहमान डकैत बाबू डकैतची दगडाने ठेचून हत्या करतो. रहमानच्या मुलाच्या मृत्यूमागे बाबू डकैतचा हात असतो. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रहमान डकैत हे पाऊल उचलतो.

अक्षय खन्ना (रहमान डकैत)

अभिनेता अक्षय खन्नाने या चित्रपटात रहमान डकैतची भूमिका साकारली होती. अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्याचे या चित्रपटाच्या निगडीत असणारे सगळे रिल्स सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले. पण या चित्रपटात त्याचा मृत्यू होतो.