Ranveer Singh Deepika Padukone: रणवीर सिंगच्या धुरंधर 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. जगभरातील या चित्रपटाची कमाई 800 कोटी रुपयांपर्यंत जाऊन ठेपलीय. या फिल्मचा सगळीकडे कौतुक होत असताना रणवीर ची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला गैरहजर राहिल्याने अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. एकीकडे ट्रोल होत असताना रविवारी दुपारी दीपिका आणि रणवीर मुंबईत पहिल्यांदाच एकत्र दिसले. त्यामुळे रणवीर आणि दीपिकामध्ये काही बिनसलं असल्याच्या चर्चा आता थांबल्या आहेत. (Dhurandhar 2)
रणवीर आणि दीपिका मुंबईच्या वरळी भागातील एका रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले होते. दोघांना बाहेर पडताना पॅपराझी आणि चाहत्यांनी रणवीर दीपिकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चहात्यांनी दोघांना पाहून बब्बर शेर अशी घोषणाबाजी केली. त्यावेळी दोघांनीही चाहत्यांना हसत प्रतिसाद दिला. मुंबईत मासळी या सीफूड रेस्टॉरंटमध्ये दोघेही गेले होते. पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम अशा लुकमध्ये दीपिकाने हसतमुखाने चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दीपिकाची तुलना होतेय यामी गौतमशी
गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोणची तुलना धुरंधर 2 चे दिग्दर्शक आदित्य धर याची पत्नी यामी गौतमशी केली जात आहे . यामी सध्या धुरंधर 2 सिनेमाचं जोरदार प्रमोशन करतेय. पण दुसरीकडे दीपिका धुरंधर रिलीज होऊन काही दिवस लोटले तरी सोशल मीडियावर एकही प्रतिक्रिया देत नाही एखादी पोस्ट किंवा व्हिडिओही शेअर करत नाही म्हणून चाहते चांगलेच नाराज झाले होते. सोशल मीडियावर दीपिका रणवीरमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण दोघांनीही एकत्र वेळ घालवल्यामुळे या चर्चा नरमल्या आहेत .
शनिवारी दीपिका आपला सासू आणि नणंदेसोबत एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये दिसली होती.त्यानंतर दोघांनाही अनेक दिवसांनी एकत्र पाहून चाहते सुखावले होते. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.रिलीज नंतर अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत.देशांतर्गत या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची कमाई 500 कोटींच्या वर गेली आहे.
