Dhurandhar 2 Advance Bookings: दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर या चित्रपटाने 2025 मध्ये मोठं यश मिळवलं होतं. आता त्याचा सिक्वेल धुरंधर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांसोबतच अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी थक्क झाले आहेत. सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'धुरंधर : द रिवेंज' चित्रपटाचा ट्रेलरने अनेकांची झोप उडवली आहे. दिग्दर्शक आदित्य धर याने कथानक पूर्ण उघड न करता चित्रपटाची झलक ज्या पद्धतीने दाखवली आहे त्याचा अनेकांकडून कौतुक होतंय.

Continues below advertisement

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच विक्रम

‘धुरंधर 2’साठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग 7 मार्च रोजी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सुरू झाली. त्यानंतर केवळ 24 तासांत BookMyShow या प्लॅटफॉर्मवर सुमारे 87 हजार तिकीटांची विक्री झाली. 9 मार्चच्या सकाळपर्यंत हा आकडा 1.5 लाखांवर गेला, तर एकूण तिकीट विक्री 2 लाखांहून अधिक झाली आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या पेड प्रीमियर शोसाठी देशभरात सुमारे 2.06 लाख तिकीटांची विक्री झाली असून यामुळे सुमारे 12.29 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. यातील बहुतांश कमाई हिंदी व्हर्जनमधून झाली असली तरी तमिळ डब व्हर्जनलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकलं

प्रीमियर शोच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच ‘धुरंधर 2’ने अनेक चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकलं आहे. शहीद कपूरच्या ओ रोमिओ या चित्रपटाने भारतात सुमारे 9 कोटींची ओपनिंग केली होती, तर टायगर श्रॉफच्या बाघी 4 ने जवळपास 12 कोटींची कमाई केली होती. मात्र ‘धुरंधर 2’ने केवळ प्रीमियर शोच्या बुकिंगमधूनच 12.29 कोटींचा आकडा पार केला आहे.

Continues below advertisement

‘धुरंधर 2’ची कथा

‘धुरंधर 2’मध्ये रणवीर सिंग कराचीमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय गुप्तहेर हमजा उर्फ जसकीरतच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिक्वेलमध्ये त्याची बॅकस्टोरी आणि 26/11 दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या ल्यारी गँग्सविरुद्धचा बदला दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात अर्जुन रामपाल , संजय दत्त , आर माधवन , राकेश बेदी  आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वीच मिळालेल्या या प्रतिसादामुळे बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट मोठा धमाका करेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा 

Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस