Dhurandhar 2 Photo Video Leak: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाला चित्रपटगृहात 58 दिवस पूर्ण झाले असले, तरी चित्रपटाची कमाई अजूनही जोरात सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचत असतानाच, ओटीटीवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, भारतात सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, 19 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘धुरंधर 2’ बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पहिल्या भागात वारंवार उल्लेख होणाऱ्या, मात्र चेहरा न दाखवलेल्या ‘बड़े साहब’ या भूमिकेचा सस्पेन्स दुसऱ्या भागात उलगडणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, प्रेक्षकांचा संयम सुटत चालला असून, आता सोशल मीडियावर विविध अंदाज बांधले जाऊ लागलेत.

सेटवरील फोटो-व्हिडीओ लीक

‘धुरंधर 2’च्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ लीक झाल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. लीक झालेल्या एका फोटोमध्ये अर्जुन रामपाल आणि संजय दत्त बाल्कनीत उभे राहून चर्चा करताना दिसत आहेत. चित्रपटात संजय दत्त चौधरी एसपी असलम, तर अर्जुन रामपाल आयएसआय मेजर इक्बाल यांच्या भूमिकेत आहेत. हा फोटो व्हायरल होताच, अनेक चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे की, ‘बड़े साहब’ अर्जुन रामपालच असू शकतो. काहीजणांनी संजय दत्त यांचाही अंदाज व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

 

‘बड़े साहब’ अर्जुन रामपालच? चाहत्यांचा अंदाज 

सोशल मीडियावर, विशेषतः X माध्यमावर, चाहत्यांनी आपापले ठोकताळे लावायला सुरुवात केलीय. एका चाहत्याने लिहिले आहे की,“लीक झालेल्या फोटोमध्ये एसपी असलम आणि मेजर इक्बाल यांची भेट दिसते. जर मेजर इक्बालच खरे ‘बड़े साहब’ असतील तर? आणि जर असलम त्यांना रहमान डाकैतच्या हत्येचा कट हमजाने रचल्याची माहिती देत असेल, तर? यानंतर इक्बाल, हमजावर गुप्त चौकशी करण्याचे आदेश देऊ शकतो.”

या अंदाजानुसार, दुसऱ्या भागात हमजाला उघड करण्याऐवजी, इक्बाल ही माहिती दबावासाठी वापरून हमजाला स्वतःसाठी काम करण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळेच हमजा ‘शेर-ए-बलुच’ बनून बलुचिस्तानात परत जातो, असे चित्र उभे केले जात आहे. पुढे चौकशी करत असताना, असलम जसकीरतविषयी सत्य उघड करतो आणि त्यानंतर त्याचा कार बॉम्ब स्फोटात मृत्यू होतो,ज्याचा इशारा ‘धुरंधर पार्ट 1’च्या ट्रेलरमध्ये देण्यात आला होता, असा दावा या थिअरीत करण्यात आला आहे.

‘धुरंधर’मध्ये दमदार स्टारकास्ट

‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. पहिल्या भागात ‘बड़े साहब’ हे पात्र पडद्यामागेच राहिल्याने, दुसऱ्या भागाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.आता लीक झालेले फोटो-व्हिडीओ आणि चाहत्यांच्या थिअरीज पाहता, ‘बड़े साहब’ कोण असणार याचा उलगडा होण्याची प्रेक्षकांना उत्सुकतेने प्रतीक्षा आहे. 19 मार्चला प्रदर्शित होणारा ‘धुरंधर 2’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.