Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’  चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. 1300 कोटींचा जगभर गल्ला कमावल्यानंतर या (Dhurandhar 2) चित्रपटाततील छोट्या छोट्या भूमिकांचीही चर्चाय. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असतानाच चित्रपटातील कलाकारांचंही प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. (Box Office Collection) याच दरम्यान चित्रपटात यासिरची भूमिका साकारणाऱ्या अभय अरोराने रणवीर सिंहबद्दल एक खास खुलासा केला आहे. शूटिंगमध्ये जास्त असताना रणवीर दीपिका आणि त्याच्या लेकीला कसा वेळ द्यायचा याविषयी त्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

शूटिंगमध्ये असताना रणवीरने कुटुंबाला कसा दिला वेळ?

अभिनेता अभय अरोराने सांगितलं की, शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त असूनही रणवीर सिंह आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला विसरत नसे. विशेषतः त्याची प्रेग्नंट पत्नी दीपिका पादुकोणसाठी तो नेहमीच वेळ देत असे. अभय म्हणाला, “रणवीर शूटिंगच्या मध्ये-मध्ये सुट्टी घेण्याचा प्रयत्न करायचा. जरी फक्त तीन-चार दिवस मिळाले तरी तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी नक्की जात असे. कुटुंबाची तो ज्या पद्धतीने काळजी घेतो, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.”

2018 मध्ये लग्न, 2024 मध्ये लेकीचे स्वागत

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी 2018 मध्ये लग्न केलं. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचं, दुआचं स्वागत केलं. 2025 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर तिची एक झलक शेअर केली होती, जी पाहून चाहते तिच्या गोडव्यावर फिदा झाले होते.

Continues below advertisement

‘धुरंधर 2’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई

‘धुरंधर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत आहे. हा चित्रपट अलीकडच्या काळातील मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरत आहे. चित्रपटाने भारतात तब्बल 715.92 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसह संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांची प्रमुख भूमिका आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर : द रिवेंज' धुमाकूळ घालतोय. आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर असलेला हा सिनेमा 'धुरंधर 2'धुवांधार कमाई करतोय. खरं तर हा सिनेमा 2018 मध्ये आलेल्या एका सिनेमाच सीक्वेल आहे. ज्याची सारेच आतुरतेनं वाट पाहत आहेत. याच्या पहिल्या पार्टनं बॉक्स ऑफिसवर चांगलाच जम बसवलेला आणि जोरदार कमाईही केली होती. आजही या सिनेमाचं अनेकजण कौतुक करतात.