Dhurandhar 2: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) सध्या बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 Box Office Collection) धुवांधार कमाई करतेय. सिनेमा रिलीज झाल्यापासूनच, या सिनेमाची सगळीकडे मोठी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन अवघे 11 दिवस उलटलेत आणि या कालावधीतच, सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. सिनेमाची ही कमाईच त्याच्या अफाट यशाचा स्पष्ट पुरावा ठरते. हा सिनेमा पूर्णपणे पाकिस्तानवर आधारित असून, एका भारतीय गुप्तहेरानं पाकिस्तानात राहून त्यांच्या काळ्या कारनाम्यांचा पायाच कसा हादरवून टाकला, याचं चित्रण यात करण्यात आलंय.
लियारीच्या लोकांची आदित्य धरकडे मोठी मागणी (Pakistani Lyari Resident Ask 500 Crore To Director )
एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटाशी झुंज देतोय, अशातच लियारी इथल्या रहिवाशांनी भारतीय सिनेनिर्माते आदित्य धर यांच्याकडे त्यांच्या सिनेमातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी तब्बल 80 टक्के रक्कम सुपूर्द करण्याची मागणी केलीय. पाकिस्तानमध्ये या सिनेमावर बंदी असूनही, स्थानिक लोक ते पाहत आहेत. आता सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्या एकूण उत्पन्नापैकी 80 टक्के रक्कम सुपूर्द करण्याची मागणी केलीय. पाकिस्तानमध्ये या सिनेमावर बंदी असूनही, स्थानिक लोक हा सिनेमा पाहत आहेत. अशातच आता, सिनेमा पाहिल्यानंतर लियारीच्या लोकांनी दिग्दर्शकाकडे आपला हक्क मागितला आहे. तसेच, रस्त्यांची बांधणी, गटारांची झाकणं (मॅनहोल कव्हर्स) बसवण्यासाठी 500 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी सिनेनिर्मात्यांकडे केलीय.
दरम्यान, आदित्य धर यांनी सिनेमाच्या कमाईपैकी 80 टक्के रक्कम लियारीच्या लोकांसाठी राखून ठेवावी, जेणेकरून त्या भागातील रस्त्यांच्या देखभालीचं काम करणं शक्य होईल, असं अनेकांनी सुचवलंही आहे.
'धुरंधर 2'ची वीकेंडला धुवांधार कमाई (Dhurandhar 2 Box Office Collection)
'धुरंधर 2'बाबत बोलायचं तर, भारतात फिल्मनं 846.87 कोटी रुपयांचा नेट बिजनेस केलाय. रणवीर सिंह (Ranveer Singh) ची ही फिल्म त्याची आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म बनली आहे. तर, आंतरराष्ट्रीय लेव्हलवर फिल्मच्या कलेक्शनबाबत बोलायचं तर, फिल्मनं आतापर्यंत 1350 कोटी रुपयांचा बिजनेस केलाय. असं म्हटलं जातंय की, लवकरच हा आकडा 1500 कोटींच्या पार जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
