Dhurandhar 2:महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता चार राज्यांमधील विधानसभेच्या घोषणा नुकत्याच करण्यात आल्या. पश्चिम बंगाल, केरलम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या चार राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झालीय. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'धुरंधर द रिवेंज' या चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी लागू असलेल्या आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित करत मद्रास उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

धुरंधर 2 चित्रपटाचा सध्या जगभर एकच डंका वाजलाय.रणवीर सिंगचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमी करत आहे. अवघ्या 5 दिवसात या चित्रपटाने देशांतर्गत 550 कोटी रुपयांची कमी केलीय. तर जगभरात 211 कोटी रुपये कमवत एकूण कमाई 800 कोटींच्या घरात पोहोचलीय. हा चित्रपट सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉमिओ असल्याने या चित्रपटाची चर्चा अधिक आहे.

धुरंधर 2 वर निवडणुकीच्या काळात बंदी घालण्याची मागणी 

मिळालेल्या माहितीनुसार, एका वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती G अरुल मुरुगन यांच्या खंडपीठासमोर मौखिक उल्लेख करत सांगितले की, चित्रपटात राजकीय आशय असल्यामुळे निवडणुकीच्या काळात त्याचे प्रदर्शन टाळावे. असे सांगितले. राज्यात पुढील महिन्यात मतदान होणार असल्याने या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळेबाबत वाद निर्माण झाला आहे.

मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्रथम अधिकृतपणे रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतरच तातडीने सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालायची की नाही, याचा निर्णय पुढील सुनावणीनंतरच होणार आहे.

दरम्यान, जन नायकन या चित्रपटालाही अशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. Central Board of Film Certification (CBFC) ने या चित्रपटाला अद्याप प्रमाणपत्र न देता प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. कारण, निवडणूक काळात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे संवेदनशील विषयांवर अधिक लक्ष ठेवले जात आहे.

धुरंधरची कथा प्रचंड गाजतेय...

‘धुरंधर: द रिव्हेंज’ची कथा कराचीतील लियारी भागाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, जो गँगवॉरमुळे ओळखला जातो. चित्रपटात काल्पनिक कथा आणि वास्तव घटनांचे संदर्भ एकत्र गुंफले गेले आहेत. यात कंधार हाय जॅकिंग, 2001 पार्लमेंट अटॅक आणि 26/11 मुंबई अटॅक यांसारख्या घटनांचा उल्लेख आहे.

हा चित्रपट ‘धुरंधर’च्या सिक्वेलच्या रूपात आला असून, रणवीर सिंह याच्या पात्राच्या प्रवासावर आधारित आहे. जस्किरत सिंग रंगीपासून हमजा अली मझारीपर्यंतचा त्याचा प्रवास, कराचीच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याचा उदय आणि त्याच्या गुप्तहेर भूतकाळाचा उलगडा यात दाखवण्यात आला आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील कंटेंटवर नजर

चित्रपटात अर्जुन रामपाल, R माधवन, संजय दत्त आणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, या वादामुळे त्याच्या रिलीजवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुका जवळ येत असताना राजकीयदृष्ट्या संवेदनशील कंटेंटवर वाढती नजर ठेवली जात असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. आता न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

Dhurandhar 2 PM Narendra Modi Cameo: 'धुरंधर 2'मधून सर्वात मोठं सरप्राइज; सिनेमात पंतप्रधान मोदींचा कॅमिओ, सोशल मीडियावर 'तो' सीन व्हायरल