Dhurandhar 2 vs Vaazha 2: 2026 मधील सर्वाधिक यशस्वी (Most Successful Movies Of 2026) ठरलेल्या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर, पटकन कुणीतरी 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) म्हणून मोकळं होईल. आता तुम्ही म्हणाल या गैर काय? 'धुरंधर 2'ला देशभरातून दमदार प्रतिसाद मिळालाय आणि बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 Box Office Collection) दमदार कमाईसुद्धा केलीय. पण, तुम्हालाही 2026 चा सर्वात यशस्वी सिनेमा 'धुरंधर 2' आहे, असं वाटत असेल तर, हा तुमचा गोड गैरसमज ठरेल. 2026 मधला सर्वात यशस्वी सिनेमा एक लो बजेट मूव्ही आहे. हा सिनेमा अत्यंत कमी बजेटमध्ये (Low Budget Movie) तयार करण्यात आलाय. पण, आपली पटकथा, संवाद आणि सिनेमातल्या स्टारकास्टच्या अभिनयाच्या जोरावर या सिनेमानं धुवांधार कमाई केली आहे. एवढी की, या सिनेमानं 1756 कोटी कमावणाऱ्या 'धुरंधर 2' या ब्लॉकबस्टर सिनेमालाही लोळवलं आहे.
'धुरंधर 2'नं अवघ्या 30 दिवसांतच बॉक्स ऑफिसवर 1,756 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं बजेट 225 ते 255 कोटींच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातंय. ही आकडेवारी पाहता, हा सिनेमा यशाचा प्रत्येक निकष पूर्ण करतो, या गोष्टीशी तुम्हीही कोणतेही आढेवेढे न घेता सहमत व्हाल. दरम्यान, आम्ही तुम्हाला आणखी एका सिनेमाबद्दल सांगू इच्छितो, जो अत्यंत माफक बजेटमध्ये तयार करण्यात आलाय आणि तरीही कमाईच्या बाबतीत तो प्रचंड मोठा हिट ठरलाय. या सिनेमाचं नाव 'वाझा' (Vaazha 2). हा एक मल्याळम सिनेमा असून केवळ 10 कोटींच्या बजेटवर तयार करण्यात आलेला. तरीही या सिनेमानं जगभरात एकूण 201.1 कोटींची कमाई केलीय. दरम्यान, भारतामध्ये या सिनेमाचं नेट कलेक्शन (Net Collection) 102.5 कोटी इतकं राहिलंय. IMDb वर या सिनेमाला 8.4 रेटिंग मिळालं आहे आणि या सिनेमाला अधिकृतपणे 'ब्लॉकबस्टर' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
'वाझा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Vaazha 2 Box Office Collection)
'वाझा 2' (Vaazha 2) हा 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वाझा' सिनेमाच्या सिक्वेलचा (पुढचा पार्ट) आहे. मूळ सिनेमानं आपल्या अनोख्या कथानकामुळे आणि त्यातील तरुण कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे मल्याळम सिनेसृष्टीत मोठी चर्चा निर्माण केली होती. 'वाझा' हा सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि केवळ 4 कोटींच्या बजेटवर तयार होऊनही या सिनेमानं 38 कोटींची कमाई केली होती. आता, हा नवा सिनेमा पहिल्या पार्टमधली कथा पुढे घेऊन जातो. प्रेक्षकांनी या सिनेमाची कथा, दिग्दर्शन आणि त्यातील अभिनयाचं मनापासून कौतुक केलं आहे आणि प्रेक्षकांचा हा प्रतिसाद चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाईमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे.
'वाझा 2'चे दिग्दर्शक (Vaazha 2 Director) सविन एस. ए आहेत. या फिल्मसोबत आपला डायरेक्टोरियल डेब्यू करत आहेत. फिल्मची स्क्रिप्ट आणि कहानी विपिन दासनं लिहिलीय, जे पहिल्या पार्टचे रायटर आणि प्रोड्युसर होते.
'वाझा 2'ची स्टारकास्ट (Vaazha 2 Star Cast)
'वाझा 2' सिनेमाच्या मुख्य कलाकारांमध्ये हशीर, अलन बिन सिराज, अजिन जॉय आणि विनायक यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सपोर्टिंग रोलमध्ये अल्फोन्स पुथ्रेन, विजय बाबू, सुधीर, अमित मोहन राजेश्वरी, अजू वर्गीस आणि अमीन यांचा समावेश आहे. हा सिनेमा मित्रांच्या एका ग्रुपची कथा सांगतो आणि तो 'कॉमेडी-ड्रामा' या जॉनरमध्ये मोडतो. 2 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
