Dharmendra Passed Away: बॉलीवूडचा हँडसम हंक अभिनेते धर्मेंद्र यांचं आज जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते. नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून ते जुहू येथील त्यांच्या घरीच होते. पण आज (24 नोव्हेंबर) त्यांच्या सनीविला या बंगल्यात अचानक गोंधळाचे वातावरण झालं.  बंगल्याच्या आत काहीच वेळात रुग्णवाहिका जाताना दिसली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बंगल्याबाहेर बारीकेटिंग लावलं होतं. त्यानंतर धर्मेंद्र यांच्या निधनाची खबर बाहेर आली. देओल कुटुंबीयांकडून कोणत्याही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलं नसलं तरी विलेपार्ले येथील स्मशानभूमीबाहेर धमेंद्र यांचे जवळचे नातेवाईक कुटुंबीय मित्रपरिवार दिसला. 

Continues below advertisement


गेल्या सहा दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेलाय. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत पाकिस्तान आणि फाळणीचा उल्लेख करताना काही खास गोष्टींचा उल्लेख केला होता.धर्मेंद्र वयाच्या आठव्या इयत्तेत असताना भारत पाकिस्तान फाळणी झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 


धर्मेंद्र आणि फाळणीच्या आठवणी


एका जुन्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी त्यांच्या बालपणीच्या काही खास आठवणी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते की," मी आठव्या इयत्तेत असताना भारत पाकिस्तान फाळणी झाली होती. अब्दुल जब्बार अक्रम आणि मोहम्मद अली हे माझे मित्र होते. आम्ही फार जिव्हाळ्यानं प्रेमानं राहायचो. आमच्यात कोणताही भेदभाव नव्हता. आता फाळणीबद्दल ऐकायला विचित्र वाटतं. पण त्या काळी फाळणी होत होती तेव्हा आमचे रुक्मनुद्दीन मास्तर बाजारातून बाहेर पडत होते. त्यावेळी मी त्यांना बिलगून रडायला लागलो. त्यांना मिठी मारली. तुम्ही आम्हाला का सोडून जात आहात असं मी सतत विचारत होतो. तेव्हा ते म्हणाले होते की, नाही बेटा.. आम्हाला जावं लागेल.


‘शोले’च्या नायकाची पाकिस्तानातील आठवण


एका कार्यक्रमात 500 हून अधिक फाळणीच्या कथा रेकॉर्ड करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले होते की तो धर्मेंद्रचा एक व्हिडिओ पाहत होता .ज्यामध्ये धर्मेंद्र म्हणत असतात की मला माझ्या बालपणीच्या मित्रांना भेटायचं आहे. त्यांच्याशी बोलायचं आहे. पण हे कोणालाही कळू शकत नाही. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की जेव्हा मी पाकिस्तानातील फैसलाबाद येथे काही वृद्ध लोकांशी बोललो त्यावेळी एक वृद्ध व्यक्ती आम्हाला भेटला. त्या व्यक्तीने सांगितलं की धर्मेंद्र चे वडील शाळेत शिक्षक होते. ते त्यांच्यासोबत शिकायचे. धर्मेंद्र यांचा एक मित्रही तिथे सापडला होता ज्याने त्याच्या घरात शोले चित्रपटाचे पोस्टर लावलं होतं. अशी माहिती त्याने सांगितली.