Nayanthara Beyond The Fairy Tale : सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नयनताराच्या आयुष्यावर आधारित 'नयनतारा : बियॉन्ड द फेरीटेल' डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. नयनताराच्या डॉक्युमेंट्रीवर साऊथ अभिनेता धनुषने 10 कोटींची कॉपीराईट केस केली आहे. आता धनुषने नयनताराला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. नयनताराने धनुष विरोधात सोशल मीडियावर ओपन लेटर लिहित निशाणा साधला होता. त्यानंतर आता धनुषच्या लीगल टीमने नयनताराला 24 तासांचा अल्टिमेटम देत नोटीस धाडली आहे.
नयनताराला धनुषकडून 24 तासांचा अल्टिमेटम
नयनताराने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आणि कडक शब्दात धनुषविरोधात तिच्या भावना व्यक्त केल्या. या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरण्यात आलेल्या धनुषच्या चित्रपटातील काही सेकंदांच्या गाण्यासाठी नयनताराने 10 कोटी रुपये शुल्क आकारल्याचं सांगितलं होतं. 'नानुम राउडी धान' चित्रपटातील गाण्याचा एक छोटासा भाग 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये वापरण्यात आला आहे, याचे दिग्दर्शन अभिनेत्री नयनताराचा पती विघ्नेश शिवन याने केलं आहे आणि यामध्ये नयनतारा स्वतः मुख्य भूमिकेत आहे. आता नयनताराला धनुषच्या टीमकडून थेट आणि स्पष्ट शब्दात कायदेशीर कारवाई करण्याची सक्त धमकी देण्यात आली आहे.
नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीला कायदेशीर नोटीस
नयनताराच्या सोशल मीडियावर लिहिलेल्या खुल्या पत्रात नयनतारा : बियॉन्ड द फेयरीटेल या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीवर 10 कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याबद्दल अभिनेता धनुषवर टीका केली. यानंतर हा वाद आणखी उफाळला आहे. 'नानुम राउडी धान' या चित्रपटातील पडद्यामागील तीन सेकंदांचा व्हिडीओ वापरण्यावरुन ही कॉपीराईटचा हा वाद सुरु झाल्याचं समोर येत आहे. नयनतारा आणि धनुष यांच्यातील वाद आता सर्वांसमोर आला आहे. आता, धनुषच्या वकिलाने नयनताराला अधिकृत नोटीस पाठवत 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
लीगल नोटीसमध्ये काय म्हटलंय?
धनुषच्या लीगल टीमने दिलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, "माझा क्लायंट चित्रपटाचा निर्माता आहे आणि त्यांना माहित आहे की, त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी एक-एक पैसा कुठे खर्च केला आहे. तुमच्या क्लायंटने असं म्हटलं आहे की, माझ्या क्लायंटने कोणत्याही व्यक्तीला BTS सीन शूट करण्यासाठी नेमलं नव्हतं आणि हे निराधार आहे".
महत्त्वाच्या इतर बातम्या :