Dhanush and Mrunal Thakur Wedding Rumours: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष त्याचे चित्रपट आणि अभिनयासाठी चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडतंय? याचीही तितकीच चर्चा होते. 2024 साली धनुषने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर तो पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष मृणाल ठाकूरला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. तो मृणाल ठाकूरशी 14 फेब्रुवारी रोजी लग्न करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोघे लग्नबंधनात अडकले असल्याचं दिसत आहे. दोघांनीही गुपचूप लग्न उरकले का? अशी चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ एआय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ खरा आहे की खोटा, हे अद्याप समोर आलेले नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हारयरल होत आहे. या व्हिडिओ एक जोडपं लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे काही साऊथचे कलाकार उभे असलेले दिसत आहेत. या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देत आहेत. व्हिडिओमध्ये थलापती विजय, दुलकर सलमान, अनिरूद्ध रविचंदर आणि श्रुती हासन दिसत आहे. पण हा व्हिडिओ नक्की खरा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, धनुष आणि मृणाल ठाकूरच्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ खरा नसून, एआय जनरेटेड आहे. देव पाल नावाच्या एका इन्स्टग्राम वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानं या व्हिडिओला कॅप्शन देखील दिलं आहे. "रिपोर्ट्सनुसार, धनुष आणि मृणाल ठाकूर यांनी 22 जानेवारी रोजी चेन्नईमध्ये एका खासगी कौटुंबिक लग्नसमारंभात लग्न केले". "कोणतीही अधिकृत माहिती नाही. कोणतीही घोषणा नाही, कोणतेही फोटोही नाही. फक्त ही लीक झालेली झलक जी ऑनलाइन धुमाकूळ घालत आहे", असंही त्यानं कॅप्शनमध्ये दिलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
कामाच्या बाबतीत, धनुषचा शेवटी एल. रॉय दिग्दर्शित 'तेरे इश्क' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात कृती सेनन प्रमुख भूमिकेत होती. दरम्यान, मृणाल ठाकूर लवकरच 'डकैत' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
