Dhanush Mrunal Thakur: साऊथ सुपरस्टार धनुष कायम त्याच्या चित्रपटांमुळे तर चर्चेत असतोच, पण तो आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या चर्चा आहे धनुषच्या लग्नाची. गेल्या काही दिवसांपासून तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा व्हायरल होत होत्या. धनुष या अभिनेत्रीशी लग्न करणार असल्याचं कळताच सोशल मीडियावर ही बातमी तुफान व्हायरल झाली.  ही बातमी पसरताच चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि साऊथ सुपरस्टार धनुष फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही. दोघांनीही याबाबत कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. 

Continues below advertisement

धनुष - मृणाल ठाकूरच्या अफेअरची चर्चा

बॉलीवूडमध्ये एखाद्याच्या अफेअरची चर्चा होणं काही नवीन नाही. खरंतर ऑगस्ट 2025 मध्ये मृणाल ठाकूरने धनुष आणि तिच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. धनुष फक्त एक चांगला मित्र आहे असं ती म्हणाली होती. एका मुलाखतीत धनुष आणि तिच्या अफेअरच्या चर्चा गमतीच्या वाटत असल्याचेही तिने सांगितलं होतं.  धनुष मुंबईत तिच्या सन ऑफ सरदार 2 चित्रपटाच्या प्रदर्शनाला खास आला होता. अभिनेता अजय देवगनने त्याला आमंत्रण दिलं होतं. या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात धनुष आणि मृणाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. या व्हिडिओमध्ये मृणाल आणि धनुष हात धरून एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसले होते.  शिवाय तेरे इश्क मे सिनेमाच्या पार्टीत मृणाल गेली होती. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मृणाल धनुष दोन्ही बहिणींना instagram वर फॉलो करते. त्यामुळे मृणाल आणि धनुष यांचा अफेअर असून त्यांना नातं आत्ताच उघडकीस आणायचं नसल्याचं बोलला जात होतं. 

दरम्यान या चर्चांमध्ये अचानक लग्नाची तारीखच समोर आल्याने चाहते गोंधळात पडले. दोघेही फेब्रुवारी 2026मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी लग्न बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्या चर्चाच आहेत. याबाबत दोघांपैकी कोणीही अधिकृत भाष्य केलेले नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “मृणालचं पुढच्या महिन्यात लग्न होत नाहीय. ही निव्वळ अफवा आहे.”  मृणालच्या ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटाची रिलीजही त्याच कालावधीत आहे, ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Continues below advertisement

लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम

सूत्रांनी सांगितलं की, “फेब्रुवारीमध्ये तिचा एक मोठा चित्रपट रिलीज होणार आहे. अशा वेळी रिलीजच्या इतक्या जवळ लग्न करणं शक्य नाही. त्यानंतर मार्चमध्ये तिचा आणखी एक तेलुगू चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.” त्यामुळे लग्नाच्या बातम्यांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. मृणाल ठाकुर आणि धनुष एकमेकांना काही काळापासून डेट करत असल्याच्या चर्चा असल्या तरी, दोघांनीही आपल्या नात्याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही. सध्या तरी मृणाल -धनुषच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे चाहत्यांना कोणतीही ठोस माहिती मिळेपर्यंत थोडा संयम ठेवावा लागणार आहे. आत्ता तरी ही सगळी चर्चा फक्त अफवांपुरतीच मर्यादित असल्याचं स्पष्ट झालं आहे.