Dhanush Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार धनुषचा (Dhanush) आज 39 वा वाढदिवस आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन धनुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. धनुषचा जन्म 28 जुलै 1983 रोजी झाला. त्याचे वडील कस्तुरी राजा हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'थुलुवधो इलमई' या कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून धनुषनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. धनुषचं खरं नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा असं आहे. करिअरच्या सुरुवातीला धनुषला त्याच्या लूकमुळे अनेकांनी ट्रोल केलं होतं. आज धनुषनं हॉलिवूड, बॉलिवूड अन् साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.
धनुष आहे कोट्यवधींचे मालक2019 मधील एका रिपोर्टनुसार, धनुष हा 160 कोटी संपत्तीचा मालक आहे. धनुष एका चित्रपटासाठी सात ते आठ कोटी मानधन घेतो. चेन्नईमध्ये धनुषचे आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 25 कोटी आहे. धनुषकडे रेंज रोव्हर, रॉल्स रॉयस घोस्ट आणि मर्सिडीज बेंज यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत.
धनुषला लोक करत होते ट्रोल
2015 साली काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवर करण्यात आलेल्या बॉडी शेमिंगबद्दल एका मुलाखतीमध्ये धनुषनं सांगितलं,'काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवरील काही लोक मला विचारत होते की, हीरो कोण आहे. मी दुसऱ्या कलाकाराकडे इशारा केला. पण जेव्हा त्यांना कळालं की मी हीरो आहे तेव्हा सेटवरील लोक हसत होते. ते मला रिक्षावाला म्हणत होते. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. ' धनुष पुढे म्हणाला, 'मी माझ्या कारमध्ये गेलो आणि रडायला लागलो. कारण मी तेव्हा लहान होतो. तिथे असा एकही व्यक्ती नव्हाता ज्यानं मला ट्रोल केलं नाही.
हॉलिवूडमध्ये देखील धनुषचा डंका
धनुषनं द ग्रे मॅन (The Gray Man) या रुसो ब्रदर्सच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. द ग्रे मॅन हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला.
हेही वाचा: