Dhananjay Powar and Irina Rudakova Celebrates Bhaubij  :  कोल्हापुरात पुन्हा एकदा धनंजयने (Dhananjay Powar ) परदेसी गर्ल इरिनाचा (Irina Rudakova) खास पाहुणचार केल्याचं पाहायला मिळालं. तसेच इरिना आणि धनंजयने भाऊबीजही साजरी केली आहे. यावेळी वैभव (Vaibhav Chavan) देखील इरिनासोबत होता. भाऊबीजेच्या दिवशी धनंजयने आपल्या परदेसी बहिणीसाठी मिसळीचा बेत आखला होता. इतकच नव्हे तर स्वत:च्या हातने तिला मिसळ बनवूनही दिली. 


इरिना काही दिवसांपूर्वीच धनंजयच्या घरी गेली होती. यावेळी तिचं खास कोल्हापुरी पद्धतीने धनंजयच्या घरच्यांनी स्वागतही केलं होतं. त्यानंतर आता इरिना आणि वैभव दोघेही धनंजयच्या घरी पोहचले आणि त्यांचा पुन्हा एकदा स्पेशल पाहुणचार धनंजयकडून करण्यात आला आहे.                               


धनंजयने इरिनासाठी तयार केली खास मिसळ


धनंजय आणि इरिनाने त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये इरिना धनंजयला विचारते की, भावा काय करतोय? त्यावर धनंजय म्हणतो की, तुझ्यासाठी खास मिसळ आणली आहे. तेव्हा इरिना म्हणते की, माझ्यासाठी मिसळ...बापरे..इतकं प्रेम..नुसतं प्रेम... त्याचवेळी इरिनाच्या बाजूला बसेलला वैभव म्हणतो की, तिच्या एकटीसाठी मिसळ आणलीये का? तेव्हा धनंजय म्हणतो की, वैभ्या जळला... त्यावर पुन्हा एकदा वैभव म्हणतो की, तुम्ही माझ्यासाठी मिसळ आणली नसेल तरीही मी खाणार आहे... पुन्हा इरिना म्हणते की, हाताने आणि अगदी प्रेमाने...






अंकिता आणि धनंजयनेही साजरी केली भाऊबीज


अंकितानेही धनंजयच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली होती. यावेळी अंकिता धनंजयसाठी खास कोकणातले मासेही घेऊन गेली. तसेच तिने आता वहिनींना काश्मीरला घेऊन जा असं बजावून तिच्या भावाला सांगितलं असल्याचंही पाहायला मिळालंय.     






ही बातमी वाचा : 


Aishwarya Rai : 'आम्ही ऐश्वर्यासाठी.... 'अभिनेत्रीच्या वाढिदिवसानंतर अमिताभ यांचं 'ते' ट्विट व्हायरल