Dhananjay Pawar on Suraj Chavan: 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi) मराठीच्या पाचव्या सिझनने टेलिव्हिजन विश्वात धुमाकूळ घातला होता. या सिझनमध्ये झापुक झुपूक करत अभिनेता आणि इन्फ्ल्युएंसर सुरज चव्हाणने (Suraj Chavan) ट्रॉफी जिंकली. या सिझनमध्ये 'डीपी दादा' अर्थात धनंजय पोवार (Dhananjay Pawar) याने देखील सहभाग घेतला होता. सूरज (Suraj Chavan) आणि धनंजय यांच्यातील मैत्रितील केमिस्ट्री खूप भन्नाट होती. दोघांचं एकमेकांशी खूप चांगलं बॉण्ड तयार झालं होतं. मात्र, शो संपल्यानंतर त्यांच्यातील मैत्रीत मिठाचा खडा पडला. सूरजच्या नव्या घरात धनंजय फर्निचर गिफ्ट म्हणून देईल, असं आश्वासन त्याने दिलं होतं. पण धनंजयने दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. यावरुन त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, अलिकडेच धनंजय याने पॉडकास्टमध्ये नक्की काय घडलं, याची संपूर्ण माहिती दिली.
सूरज चव्हाणबाबात धनंजय पवार नेमकं काय म्हणाला? (Dhananjay Pawar on Suraj Chava Sofa Controversy)
अलिकडेच धनंजय पोवार याने 'द मराठी फाऊंडर' या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत धनंजय म्हणाला, 'एका व्हिडीओत सूरज म्हणाला होता की, डीपी दादा मला सोफा सेट गिफ्ट देणार होता. तर, मी सूरजला ठीक आहे देतो, असं म्हणालो. हे सगळं बिग बॉसच्या वेळेस घडलं होतं. त्याच्या घरी सोफा पाठवताना त्याच्या घराचा पत्ता वगैरे कळत नव्हता. तेव्हा मी म्हटलं त्याला की तुझं लग्न होऊदेत मग आपण तुला सोफा देऊ', असं धनंजय म्हणाला.
'जेव्हा मी सूरजच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घरी सोफा, डायनिंग टेबल आधीच भेट म्हणून देण्यात आली होती. मग सर्वत्र याची चर्चा होऊ लागली. या भेटवस्तूंचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. हा सोफा डीपी दादांनी दिला असं आम्हाला वाटलं, धनंजय दादा खोटारडा आहे, अशाप्रकारच्या कमेंट्स व्हिडीओवर येऊ लागल्या. नंतर मला समजलं की, अजित दादांनी सूरजच्या घरी या भेटवस्तू पाठवण्यास सांगितलं होतं'.
'जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मी सुरजला याबद्दल व्हिडीओ शेअर करुन सर्वांना सांगायला लावलं. 'की या गोष्टी मला दादांनी आधीच पाठवलं आहे. डीपी दादाकडून काही घेतलं नाही', असं मी त्याला व्हिडीओत म्हण असं सांगितलं होत. यानंतर सुरज म्हणाला मी कसं बोलू? तेव्हा मी त्याला राहुदेत बाबा, तुझे विचार तुझ्याकडे ठेव असं म्हणालो. लोक मला शिव्या देत होते, म्हणून मी व्हिडीओ तयार करुन शेअर केला. मला त्याची ही गोष्ट खटकली. एकदा माणूस मनातून उतरला की उतरला. मी सगळं त्याला चांगल्या मनाने देणार होतो. गैरसमज झाल्यानंतर लोक मला ट्रोल करु लागले. खोटारडा म्हणू लागले. मी त्याला खरंच सांग, असं म्हणत होतो', असं मुलाखतीत धनंजयने स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
