Devdatta Nage : अभिनेते देवदत्त नागे यांनी हिंदीसह दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये. विशेष म्हणजे सिनेमांसोबतच त्यांनी टेलिव्हिजन विश्वात देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 'जय मल्हार' या मालिकेमुळे देवदत्त नागे यांना खरी ओळख मिळाली. त्यांचा जय मल्हार मालिकेतील लूक आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मात्र, सध्या देवदत्त नागे जय मल्हार मालिकेवेळीच्या बऱ्याच आठवणी शेअर करताना पाहायला मिळत आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी जेजुरीत घर देखील घेतलं होतं. आता त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जय मल्हार मालिकेबाबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सोबत जेजुरीमध्ये घर घेण्यामागे खरं कारण काय याबाबतही माहिती दिली आहे.
देवदत्त नागे यांची इन्स्टाग्राम पोस्ट जशीच्या तशी
देवदत्त नागे म्हणाले, जय मल्हार चा पहिला Episode 18 May 2014 प्रक्षेपित झाला आणि माझा श्री खंडेरायां प्रति एक अलौकिक प्रवास सुरु झाला. मनात येईल तेव्हा श्री खंडेरायांच्या .. म्हाळसा आई बानू आईच्या दर्शनाला जायचे आणि आशिर्वाद घ्यायचे. हा नियम असयचा.. रात्री 11 ला Pack up व्हायचे आणि तिथेच Set वर स्नान करून लगेच गाडीला Starter मारून Direct माझी जेजुरी गाठायचो. मध्य रात्री साधारण 3 am ला पोहोचायचो. मग 5-5:30 am पर्यंत Road वरच गाडी मध्ये बसून रहायचो. त्यानंतर श्री खंडोबाचे दर्शन आणि मग परतीचा प्रवास करायचो.
पुढे लिहिताना देवदत्त नागे म्हणाले, श्री खंडोबाची प्रेमळ ओढ त्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत तशीच आहे. गेली 3-4 वर्ष वाटायला लागलं होतं की तिथेच आपलं एक छोटासं घर असावे, पण माझ्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता.... एक दिवस बारामतीहून जेजुरीकडे जात असताना त्या पुला वरून सहज लक्ष गेलं, तिथे काही plotings होती. त्या जागेवर जाऊन बघितलं तर तिथून श्री खंडेरायांच्या जेजुरी गडाचे मनमोहक दर्शन घडले. त्या दिवशी मित्र परिवारातील एका मित्राच्या दुकानाचे Opening आटोपले आणि माझा मित्र युवराज ह्याने सुचवलेल्या एका lodging मध्ये रात्री stay केला. पहाटे जेव्हा जाग आली, तेव्हा सहज त्या खिडकीमधून लक्ष गेलं तर समोर साक्षात जेजुरी गड.. आणि श्री खंडेरायांचे अलौकिक दर्शन.... तेव्हाच जेजुरीमध्ये मनात येईल तेव्हा आणि जमेल तेव्हा वास्तव्य कराचे पक्क केलं, आणि Golden Jejuri मध्ये माझी बहीण सौ अमृता ताई आणि भाऊजी श्री संदिपजी घोणे ह्यांच्या शुभहस्ते आमच्या Plots चे भुमीपूजन केले. Golden Jejuri चे Propriter डॉ. राजेश साठे पण उपस्थित होते. ते ह्या उपयुक्त जागेसाठी Brand Ambassador शोधत होते आणि त्यांनी मला त्यासाठी Request केली. मी सुरुवातीला प्रांजळ पणे नकार दिला पण माझे जेजुरीचे जवळचे मित्र कन्हैया आणि प्रथमेश ह्यां दोघांनी, डॉ राजेश साठे एक खरंच चांगली व्यक्ती आहे आणि त्यांच्या साठी Branding करण्यास सुचविले.
अश्या प्रकारे..श्री खंडेरायांच्या आशिर्वादाने माझे जेजुरी मध्ये घर होत आहे.. आणि जिथे माझे घर उभारत आहे, त्या पवित्र जागेचे Branding पण मी हाताळत आहे..गेली 12 वर्ष मी न चुकता जेजुरीला श्री खंडेरायांच्या दर्शनाला येतोय. श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा ते रुजू करून घेत आहेत त्याचेच हे फलित आहे असं मला वाटतय. माझ्या जेजुरी च्या कुटुंबाचे.. आप्तेष्टांचे.. मित्रपरिवाराचे माझ्या वर असणारे प्रेम आणि श्री खंडेरायांची कृपा खरंच अलौकिक आहे. आज Release होणार "Golden Jejuri" चा पहिला Advertisement Video तुम्हाला आणि श्री खंडेरायांच्या चरणी समर्पित आहे, असं देवदत्त नागे यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
