Dev Anands Son Actor Suniel Anand Passed Away: बॉलिवूड सिनेसृष्टीतून (Bollywood) एक दु:खद बातमी समोर येत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील दिवंगत प्रसिद्ध अभिनेता  देव आनंद (Dev Anand) यांचा मुलगा सुनील आनंद यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लंडनमध्ये (London) त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.   सुनील आनंद (Suneil Anand) यांची बहीण देविना आनंद  यांची मुलगी गिनी नारंग हिनं आपल्या मामाच्या निधनाची माहिती दिली.  तसेच, दु:खाच्या या काळात तिनं आपल्या कुटुंबियाच्या गोपनियतेचा आदर करावा, असे आवाहनही केले आहे. सध्या देव आनंद (Death) यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सिनेसृष्टीतूनही दु:ख व्यक्त केले जात आहे.

Continues below advertisement

सुनील आनंद यांचं लंडन येथे दु:खद निधन (Dev Anands Son Actor Suniel Anand Passed Away at the age of 70)

सुनील आनंद यांची भाची, गिन्नी नारंग हिनं एक निवेदन जारी करुन त्यांच्या मामाच्या निधनाची माहिती दिली. तिनं म्हटलं की, 'आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीनं  अत्यंत दु:खाने  सुनील आनंद यांच्या निधनाची बातमी देत आहोत.    आम्हाला तुमच्याकडून मिळालेलं प्रेम, प्रार्थना आणि सपोर्टमुळे  आम्हाला दिलासा मिळालेला आहे.  आम्ही याबद्दल खूप आभारी आहोत.   या कठीण काळात आमच्या कुटुंबाला एकांत दिला जावा, हीच विनंती', असं तिनं म्हटलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,   सुनील आनंद यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती आहे. यानंतर त्यांना तातडीने लंडन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.    दरम्यान, उपचार सुरु असतानाच 28 जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्य म्हणजे,  2011 साली ज्या रुग्णालयात अभिनेता देव आनंद  यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्याच रुग्णालयात देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद यांनीही  या जगाचा निरोप घेतला.

Continues below advertisement

सिनेमात नाही चालली सुनील आनंद यांची जादू

बरेच कलाकार आपल्या मुलांनाही सिनेसृष्टीत लाँच करतात.  परंतु, देव आनंद यांनी तसं केलं नाही.  त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या मुलाला सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत लाँच केले.  1984 साली देव आंनद यांनी 'आनंद और आनंद' या नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता.  देव आनंद या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.   राखी आणि स्मिता पाटील देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.  सुनील आनंद यांनी या सिनेमात सपोर्टिंग रोल साकारला होता.  परंतु, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर  फार चालला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'