Detective Tanya Puri on Actress: डिटेक्टिव्ह तान्या पुरी (Tanya Puri) आपल्या केसेससाठी ओळखली जाते. नावे गुप्त ठेवून तिने आतापर्यंत बऱ्याच गोष्टींचा मुलाखतीत उलगडा केला आहे. अलीकडेच तिने एका सेलिब्रिटी केसबाबत खुलासा केला. जे ऐकून अनेकांना जबरदस्त धक्का बसला. अलीकडेच तिने अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगितलं, जिची इमेज 'क्युट गर्ल' म्हणून आहे. तान्या पुरीने मुलाखतीत खुलासा केला की, अभिनेत्री पैशांसाठी लोकांसोबत शरीरसबंध (Actress Secret) ठेवते. तसेच तिच्या बॉयफ्रेंडला या गोष्टी ठाऊक आहेत. तान्याने सांगितलं की, हे सगळं एका हॉटेलमध्ये घडतं. तान्या पुरी लवकरच 'द ट्रेटर्स 2' (The Traitors 2) मध्ये दिसणार आहे.
डिटेक्टिव्ह तान्या पुरीचा अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा (Detective Tanya Puri has made a shocking claim about on Actress)
तान्याने Zahra Janiला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिने सांगितलं की, ' त्या महिलेने आधी बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण आता ती महिला जास्त सिनेमांमध्ये दिसत नाहीये. पण तिने चांगली संपत्ती जमवली. कॉन्टॅक्ट देखील तयार केलेत. पण तिला लोकांनी फक्त इव्हेंटमध्ये पाहिलं आहे. खरंतर बंद दाराआड ती पुरुषांना भेटते. त्यांच्यासोबत शारीरिकसंबंध ठेवते, तसेच पैसेही कमावते', असा तान्याने खुलासा केला.
'असं नाही की, ती केवळ इव्हेंट्समध्ये दिसते. यामागे बऱ्याच गोष्टी घडतात. यामागे तिची संपूर्ण टीम काम करत असते. ती अशा व्यक्तीसोबत आहे, ज्याला तिच्या सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. यामागे बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. तिची टीम संपूर्ण याकडे लक्ष ठेवून आहे. खरंतर ती महिला अशा व्यक्तीसोबत आहे, ज्याला तिच्या सगळ्याच गोष्टी ठाऊक आहेत. तो देखील त्यांच्याच टीमचा एक पार्ट आहे. तिचा पार्टनर, एका अशा व्यक्तीसोबत आहे जो तिला या गोष्टी करण्यास प्रोत्साहन देत आहे'.
' त्या महिलेने सिने इडस्ट्रीत बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. तिला प्रेक्षकांकडून प्रेमही मिळालं. पण पडद्यामागे तिच्या या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. प्रेक्षकांमध्ये तिची खूप प्रेमळ इमेज तयार झाली आहे', असं तान्या म्हणाली. दरम्यान, तान्या पुरी लवकरच 'द ट्रेटर्स 2' मध्ये दिसणार आहे. हा शो 13 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हा शो आपण अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
