Deool Band Child Actress Arya Ghare: दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांची निर्मिती असलेला ' देऊळ बंद ' या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर जवळपास 11 वर्षांनी 'देऊळ बंद 2 ' (Deool Band 2) चित्रपटाची मराठी मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीजर लॉन्च इव्हेंट अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात पार पडला. या कार्यक्रमाला स्वामी भक्तांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसलं..
देऊळ बंद 2 चित्रपटात पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. तर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे आहे. पहिल्या भागात शास्त्रज्ञ असलेल्या राघव शास्त्रीची गोष्ट दाखवण्यात आली होती. या भागातील सर्वच भूमिकांचे कौतुक झाले. मोहन जोशी,अभिनेता गश्मीर महाजनी, मोहन आगाशे, शर्वरी जेमिनीस, सुनील बर्वे, निवेदिता सराफ अशा सर्वांच्याच भूमिका गाजल्या . या चित्रपटात राघव शास्त्रीच्या मुलीच्या भूमिकेत दिसणाऱ्या लहान घ्या अभिनेत्रीच्या भूमिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. राघव शास्त्रीच्या कम्प्युटरचा पासवर्ड बदलणारी ती बालकलाकार आर्या घारे आता मोठी झालीय. देऊळ बंद 2 चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर तिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ही अभिनेत्री देऊळ बंद 2 चित्रपटातही दिसणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. तिने याचही उत्तर दिलंय.
राघव शास्त्रीच्या मुलीच्या भूमिकेतील अभिनेत्री दुसऱ्या भागातही दिसणार?
अभिनेत्री आर्या घारेने देऊळ बंद या चित्रपटात 'सना ' नावाचं पात्र साकारलं होतं. ही राघव शास्त्रीच्या मुलीची भूमिका होती. देऊळ बंद चित्रपट केल्यानंतर तिने ग्रेट माय इंडिया, बंदीशाळा, अ ब क, यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं. नंतर गाथा नवनाथांची मालिकेत ती झळकली. देऊळ बंद 2 चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अभिनेत्री आर्याने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ती दिसणार नसल्याचेही तिने या पोस्टमधून सांगितलं. देऊळ बंद हा तिचा केवळ पहिला प्रोजेक्ट नव्हता तर ते तिचं स्वप्न होतं,पहिली ओळख होती. असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.
वयाच्या साधारण सातव्या आठव्या वर्षी तिने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेली. आता तब्बल 15 वर्षांनी अभिनेत्री आर्या घारे प्रचंड सुंदर दिसते. तिचे अनेक फोटो व्हिडिओ ती . ती सतत चहात्यांना शेअर करत असते. 'देऊळ बंद ' या चित्रपटातील कलाकारांसह अनेक जुन्या आठवणी तिने यापूर्वी शेअर केल्या आहेत.
