Deool Band child Actress: 'देऊळ बंद ' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची ही तेवढीच चर्चा झाली. 'देऊळ बंद 2 ' चित्रपटाने महाराष्ट्रभर लोकांच्या मनावर गारुड केलं. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. 'देऊळ बंद 2' चित्रपटातील स्टारकास्टचंही सगळीकडे कौतुक झालं. या चित्रपटाचा निमित्ताने पहिल्या भागातील कलाकार ही चर्चेत आले. राघव शास्त्रीचं कुटुंब आजही प्रेक्षकांना तेवढेच लक्षात आहे. दरम्यान, राघव शास्त्री च्या मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री आर्या घारे (Arya Ghare) तिच्या मुलाखतीची सध्या एकच चर्चा आहे. अवघ्या सात-आठ वर्षांच्या असलेल्या या अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत देऊळ बंद या सिनेमामुळे आपल्या डोक्यात हवा गेल्याचं तिने कबूल केलं. 'इट्स मज्जा' ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

Continues below advertisement

काय म्हणाली अभिनेत्री आर्या घारे?

देऊळ बंद सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आर्या घारे हिने सिनेमात राघव शास्त्रीच्या मुलीची म्हणजेच सनाची भूमिका साकारली होती.  या चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या अभिनेत्रीने प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्याचं कबूल केलं. सिनेमाच्या सेटवर केलेल्या एका आगाऊ कमेंटनंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये आईने मारल्याचंही तिने सांगितलं. ती म्हणाली ' खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात हवा गेलीच होती.खूप हवा गेली होती. कारण 'देऊळ बंद'नंतर खूप कार्यक्रम मिळायला लागले.नंतर 'अ ब क ' या सिनेमातही मोठी स्टारकास्ट होती.त्या सिनेमाच्या शूटिंग वेळी तिथे एक ऍक्टर होते. त्यांना तहान लागली होती. त्यांनी जवळच्या स्पॉट दादांना आवाज दिला 'स्पॉट इथे ये..पाणी दे' असं ते त्याला म्हणालेले,हे मी पाहिलं होतं. त्यांचं पाहून मला असं झालं की 'हे मी पण करू शकते, मी पण बोलू शकते,आता मी पण सेलिब्रेटी आहे. मला पण लोक ओळखतात, त्यामुळे मी पण असं पाणी मागू शकते. मग मी पण म्हटलं 'स्पॉट मला पाणी पाहिजे.'

ती पुढे म्हणाली 'माझ्या बोलण्यावर आईने माझ्याकडे एक लुक दिला. मी तिच्याकडे फार लक्ष दिलं नाही. पाणी प्यायल्यानंतर ती मला म्हणाली, 'बाबू जरा माझ्यासोबत व्हॅनिटीमध्ये चल, थोडं बोलायचंय.मराठीत गेल्यावर माझ्या मम्मीने मला खूप तुडवलं. खूप मारलं मला. मी रडत होते. ती म्हणाली, 'जमिनीवर पाय ठेवायचे. कितीही उडलीस तरी खाली पंख मी छाटणार. हे माझ्या आईचे शब्द अजूनही माझे डोक्यात फिट आहेत.' असं तिने सांगितलं.

Continues below advertisement