CM Devendra fadnavis on Deool Band 2: प्रवीण तरडे दिग्दर्शित (Pravin Tarde) 'देऊळ बंद 2 - आता परिक्षा देवाची' (Deool Band 2) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमा आलेख कायम चढता राहिला आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या अफाट प्रेम आणि प्रतिसानंतर, या सिनेमाच्या टीमचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, 'देऊळ बंद 2'च्या टीमसोबत एक मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट घडली आहे.  सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर 'देऊळ बंद 2'चे मुख्य कलाकार आणि तंत्रज्ञानाच्या टीमनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची सदिच्छा भेट घेतली.

Continues below advertisement

वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन/दिग्दर्शनातून साकारलेला 'देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची' या सिनेमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे.  'देऊळ बंद 2 ' सिनेमाची टीम  आणि मुख्यमंत्र्यांची भेट मुंबईत पार पडली असून, या भेटीत सिनेमातील टीमला कौतुकाची थाप दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षक या चित्रपटाला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. 

'समाजातील सर्व थरांना, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी वर्गापर्यंत सर्वांना एकत्र आणण्याची, तसेच त्यांच्या भावनांना साद घालण्याची ताकद या चित्रपटात आहे', असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमाच्या टीमला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निर्माते कैलाश वाणी, लेखक दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी,  अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, कॅमेरामन प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच लीड मीडिया पीआर आणि मार्केटिंगचे कुशल कोंडे, अनुप गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक! (Deool Band 2 team meets CM Devendra Fadnavis)

या भेटीदरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या, 'प्रेक्षकांनी या सिनेमाल जे भरभरून प्रेम दिलंय, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे ऋणी आहोत, आभारी आहोत. त्यातच आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आमच्या संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित करणारी आहे', असं प्रवीण तरडे म्हणालेत. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी भागातील तरुण, महिला अन् ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही या सिनेमाची घौडदौड सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जून महिन्यात Netflix वर एन्टरटेनमेंटचा तडका; सस्पेन्स क्राईम ते बायोग्राफी 'या' 8 डॉक्यूमेंट्रींची मेजवानी