Deool Band 2 Team Donates Box Office Profit for Farmers Children: केवळ महाराष्ट्रातच नाही तर,  विदेशातही 'देऊळ बंद 2'चा (Deool band 2) बोलबाला पाहायला मिळत आहे.  'देऊळ बंद 2', आता परिक्षा देवाची' या सिनेमानं 100 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा गाठत मराठी सिनेसृष्टीला हादरवून सोडलं.  अलिकडेच या सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. दरम्यान,  या सक्सेसचा जल्लोष केवळ बॉक्स ऑफिसच्या आकड्यांपुरते मर्यादित न राहता, समाजोपयोगी कार्यातही करण्यात आला आहे.  चित्रपटातील प्रॉफीटमधील काही रक्कम गरजू विद्यार्थी विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊ केली आहे. 

Continues below advertisement

'देऊळ बंद 2' या सिनेमाची कौतुकास्पद कामगिरी (Deool Band 2 Team Donates Box Office Collection Profit)

'देऊळ बंद 2' या सिनेमाचा सध्या बोलबाला सुरू आहे. प्रवीण तरडे लिखीत, दिग्दर्शित आणि अभिनीत  'देऊळ बंद 2' या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं.  या सिनेमाने प्रेक्षकांच्या प्रेमाच्या जोरावर आतापर्यंत 100 कोटींची मजल मारत अनेक रेकॉर्ड तयार केले.  दरम्यान, या सिनेमाची यशोगाथा केवळ बॉक्स ऑफिसपुरते मर्यादित न राहता,  आता समाजोपयोगी होणार आहे. विशेषत: या रक्कमेमधील काही वाटा शेतकरी विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणार आहे.

'देऊळ बंद 2'  या सिनेमाच्या प्रॉफीटमधील काही रक्कम आयुष्य संपवलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार, असं टीमकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार, 'देऊळ बंद 2'  या सिनेमाच्या टीमनं विनायक हेगाणा, मकरंद अनासपूरे आणि राज देशमुख यांचा सल्ला घेतला. त्यानुसार,  3 वर्षांसाठी मराठवाडा आणि विदर्भातील  200 विद्यार्थ्यांच्या जेवणाचा खर्च उचलण्यात येणार आहे. तसेच 3 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  मुलांचा परदेशात  वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

यांसह नाशिक येथील 25 गरजू  मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात आल्याचं प्रवीण आणि कैलास वाणी यांनी सांगितलं.  हे मदकार्य पुढेही चालू राहणार, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. या यशासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी केलेल्या मदतीबद्दल अनेक कलाकारांनी प्रवीण तरडेंचं कौतुक केलं.  अवधूत गुप्ते,  संतोष जुवेकर, अभिजीत पानसे, विजू माने,  अभिजीत खांडकेकर यांसारख्या कलाकारांनी दिग्दर्शिक प्रवीण तरडेंचं कौतुक केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Akanksha Chamola on Relationship:  'मला कुणासोबतही शारीरिक संबंध...'; आकांक्षा चमोलाचा 'लॉक अप 2'मध्ये मोठा खुलासा म्हणाली, माझा घटस्फोट...