Deool Band 2 Pravin Tarde Snehal Tarde : 'देऊळ बंद' हा सुपरहिट चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा सिक्वेल प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच लिहिला असून त्याचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. आता, तब्बल 11 वर्षांनंतर, हा चित्रपट एका अगदीच नव्या कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'देऊळ बंद 2- आता परीक्षा देवाची'  (Deool Band 2) या चित्रपटात, प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे त्या  चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून प्रथमच  पदार्पण करत आहेत. 'माझा कट्टा' या कार्यक्रमातील एका मुलाखती दरम्यान, प्रवीण तरडे यांनी आपल्या पत्नीला या चित्रपटातील कामासाठी नेमके किती मानधन मिळाले, याचा खुलासा केला.

Continues below advertisement

नेमके किती मानधन मिळाले?

'देऊळ बंद 2 ' या चित्रपटासाठी स्नेहल तरडे यांना मिळालेल्या मानधनाविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की , "हे मानधन मी दिले नव्हते, तर निर्मात्यांनी दिले होते. निर्माते जे मलाही मानधन देतात. तिला मानधन मिळाले ," असे आपल्या पत्नीच्या कमाईचा संदर्भ देत त्यांनी पुढे सांगीतले, "आणि ती रक्कम खूप चांगली होती. मी मनातल्या मनात  म्हणलो चला संसाराला हातभार लागला."

स्नेहल तरडेने  पैशांचा वापर कसा केला?

प्रवीण तरडे यांनी असा अंदाज लावला, "बरं, याचा अर्थ असा की, महिन्याच्या 20  तारखेच्या दोन-तीन हप्त्यांतून आपली सुटका झाली ." पण त्यावर ती म्हणाली, "हे बघ हा माझा पहिला मोठा चित्रपट आहे अन् मला चांगले मानधन मिळालंय. त्यामुळे, या पैशांचा वापर मी गायी विकत घेण्यासाठी करणार आहे." मला वाटलं, " आता आपण आपला  दुधाचा बिझनेस सुरू करणार ?" पण ती म्हणाली, "ज्या गोशाळा शेतकर्‍यांसाठी काम करतात त्यांना गायी दान करणार, हे माझे  स्वप्न आहे कि तीचं स्वप्न पूर्ण झालं." तिने आपले सगळं मानधन गायी विकत घेण्यासाठी वापरलं आणि त्या गाई दान केल्या आणि ती त्यात खुश  आहे.. पण आता मात्र, त्या गायींची देखभाल करण्यासाठी ती माझ्याकडून दर महिन्याला पैसे घेत असते.

Continues below advertisement